AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षणाचा पत्ता नाही, पण मैदानावर उतरताच क्रिकेटर फाड-फाड इंग्रजी कसे बोलतात? सीक्रेट आलं समोर!

अनेक खेळाडू आहेत ज्यांनी फक्त 10 वी किंवा 12 वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. मात्र ते टीम इंडियामध्ये सामील होताच अस्खलित इंग्रजी बोलू लागतात. यामागील कारण जाणून घेऊयात.

शिक्षणाचा पत्ता नाही, पण मैदानावर उतरताच क्रिकेटर फाड-फाड इंग्रजी कसे बोलतात? सीक्रेट आलं समोर!
Pandya English
| Updated on: Aug 10, 2025 | 10:31 PM
Share

भारतात क्रिकेटबद्दल माहिती नाही असं एकही ठिकाण सापडणार नाही. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच क्रिकेटबद्दल प्रेम आहे. बरीच लहान मुले क्रिकेट खेळत असतात आणि एक दिवस भारतासाठी खेळण्याचे त्यांचे स्वप्न असते. मात्र भारतात अससेली स्पर्धा पाहता खूप कमी खेळाडू देशाकडून खेळताना दिसतात. यातील असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी फक्त 10 वी किंवा 12 वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. मात्र ते टीम इंडियामध्ये सामील होताच अस्खलित इंग्रजी बोलू लागतात. आज आपण कमी शिकलेले क्रिकेटपटू चांगले इंग्रजी कसे बोलू लागतात याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCI ने खेळाडूंचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी वेळोवेळी इंग्रजी भाषेचे वर्ग आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यात खेळाडूंनी इंग्रजी शिकवले जाते. पंचांसाठीही असे वर्ग आयोजित करण्यात आलेले आहेत. कारण BCCI आपल्या खेळाडूंच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे बारीक लक्ष देते. 2015 मध्ये बीसीसीआयने पंचांना इंग्रजी प्रशिक्षण देण्यासाठी एक कोर्स देखील सुरू केला असल्याची माहिती समोर आलेली आहे.

एमएस धोनीही इंग्रजी बोलताना अडखळायचा

समोर आलेल्या माहितीनुसार एमएस धोनीलाही इंग्रजी बोलण्यात अडचण येत होती. मात्र कालांतराने तो इतरांना बोलताना पाहून इंग्रजी बोलायला शिकला. जेव्हा सहकारी खेळाडू इंग्रजी बोलत असायचे तेव्हा धोनी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असे आणि त्यानंतर त्याची इंग्रजी सुधारली. स्टार खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग हे सुरुवातीला इंग्रजीत मुलाखती देणे टाळत असायचे. मात्र आता जुने आणि नवे असे दोन्ही क्रिकेटपटू स्पष्ट इंग्रजी बोलतात.

सहकारी खेळाडू इंग्रजी बोलत असतात तेव्हा इतरही खेळाडू ती भाषा शिकतात. मोहम्मद शमीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तो एका मुलाखतीला जाताना विराट कोहलीला ट्रान्सलेटर म्हणून घेऊन गेला होता. तसेच वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारदेखील राहुल द्रविडला इंग्रजी भाषांतरासाठी सोबत घेऊन जात असे. मात्र कालांतराने या दोन्ही खेळाडूंसह इतरही अनेक खेळाडूंनी इंग्रजीचे ज्ञान घेतल्याचे समोर आले आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.