AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेग स्पिनर शेन वॉर्नचा मृत्यू कसा झाला होता? 3 वर्षानंतर मोठा खुलासा

फिरकीपटू शेन वॉर्नच्या मृत्यूने क्रीडाविश्वात खळबळ उडाली होती. त्यावेळेस हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं समोर आलं होतं. मात्र नव्या रिपोर्टमध्ये वेगळाच दावा करण्यात आला आहे. डेली मेलने आपल्या आपल्या रिपोर्टमध्ये शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

लेग स्पिनर शेन वॉर्नचा मृत्यू कसा झाला होता? 3 वर्षानंतर मोठा खुलासा
शेन वॉर्नImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 01, 2025 | 2:39 PM
Share

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्नच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला होता. 4 मार्च 2022 रोजी शेन वॉर्नचा थायलंडमध्ये मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालानंतर शेन वॉर्नला हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण मृत्यूच्या तीन वर्षानंतर याबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. हा खुलासा ब्रिटीश मीडियाने केला आहे. मिडिया रिपोर्टनुसार, थायलंडच्या ज्या अलिशान बंगल्यात वॉर्नचा मृतदेह आढळला होता, तिथेच एक सेक्स ड्रगही सापडलं होतं. पण या प्रकरणाला वेगळं वळण लागू नये म्हणून तपास अधिकाऱ्यांनी तेथून ते हटवलं होतं. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, नाव सांगण्याच्या अटीवर एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, वॉर्नच्या खोलीत त्यांना ‘कामाग्रा’ नावाचं पॉवरफुल सेक्स ड्रग मिळालं होतं. रिपोर्टनुसार,’कामाग्र’ हे सेक्स औषध भारतात तयार होतं. पण थायलंडमध्ये डॉक्टरांच्या परवानगीशिवाय सहज मिळतं. पोलीस अधिकाऱ्याच्या मते, त्या औषधाचा ओव्हरडोज शेन वॉर्नच्या मृत्यूचं कारण असू शकतं. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, वॉर्नचा मृत्यू झालेल्या खोलीतून सदर औषध हटवण्याचे आदेश मिळाले होते.

डेली मेलने पोलीस अधिकाऱ्याने सांगितलेल्या माहितीच्या आधारे लिहिलं की, ज्या खोलीत शेन वॉर्नचा मृत्यू झाला होता. तेथून ड्रग्स हटवण्याचे आदेश वरून मिळाले होते. यात ऑस्ट्रेलियाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचं दिसून येतं होतं. शेन वॉर्नच्या मृत्यूचं कारण अधिकृतरित्या हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितलं गेलं आहे. पण आता या मृत्यूमागे कामाग्राचा ओव्हरडोसही असू शकतो. पण याबाबत खरं काय ते अजून समोर आलेलं नाही.

कामाग्रा औषधाचे भारताशी कनेक्शन!

कामाग्रा हे इरेक्टाइल डिसफंक्शन औषध आहे. भारतात तयार होणाऱ्या या सेक्स ड्रगवर ब्रिटनमध्ये बंदी आहे. पण इतकं असूनही हे औषध थायलंडमध्ये सहज मिळतं. वॉर्नने या औषधाचा किती भाग घेतला हे अस्पष्ट आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या ठिकाणी उलट्या आणि रक्ताचे नमुनेही होते. पण आम्हाला जे करायला सांगितले होते ते आम्ही केले. आम्ही तिथून कामाग्रा औषधाचा सर्व खुणा काढून टाकले.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.