वुमन्स वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला मिळणार इतकी रक्कम? उपविजेता संघही होणार मालामाल
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणार आहे. हा सामना 2 नोव्हेंबरला नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. असं असताना क्रीडाप्रेमींना प्रश्न पडला आहे की, विजेत्या संघाला किती रुपये मिळणार? चला जाणून घेऊयात सविस्तर

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत कधीही जेतेपद न मिळवलेले दोन संघ पोहोचले आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. 2 नोव्हेंबरला नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. दोन्ही संघ आपल्या विजेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेने इंग्लंडला, तर भारताने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आणि अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. आता फेरीत विजेतेपद मिळण्यासाठी दोन्ही संघांनी कसून सराव सुरु केला आहे. दुसरीकडे, वुमन्स वनडे वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला आयसीसी किती रक्कम देईल याची चर्चा रंगली आहे. या प्रश्नाचं उत्तर आयसीसीने स्पर्धा सुरु होण्याआधीच दिलं आहे. आयसीसीने सप्टेंबर महिन्यातच ही रक्कम 297 टक्क्यांनी वाढवली होती. आयसीसीने महिला क्रिकेट स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मोठी रकमेचं बक्षीस मिळवण्याचा मान भारत किंवा दक्षिण अफ्रिकेला मिळणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत विजेत्या संघाची जेतेपदानंतर चांदी होणार आहे. कारण आयसीसीकडून विजेत्या संघाला 4.48 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 40 कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघाला विजेत्या संघाच्या तुलनेत अर्धी रक्कम मिळेल. म्हणजेच ही रक्कम 2.24 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 20 कोटी रुपये असेल. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाला प्रत्येकी 10 कोटी रुपये मिळतील.गुणतालिकेत पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंका आणि न्यूझीलंड संघाला 6 कोटी मिळतील. तर सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या बांग्लादेश आणि पाकिस्तान संघाला अडीच कोटी रुपये मिळतील.
दरम्यान या स्पर्धेत भाग घेतलेला संघ जिंको किंवा हरो त्याला कमीत कमी 2 कोटी 50 लाख रुपये मिळणार आहेत. तर तर साखळी फेरीतील प्रत्येक विजयासाठी संघाला 34 हजार डॉलर मिळतील. म्हणजेच प्रत्येक विजयासाठी 30 लाख रुपये मिळणार आहेत. साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाने 6, इंग्लंडने 5, दक्षिण अफ्रिकेने 5, भारताने 3, श्रीलंका-न्यूझीलंड-बांगलादेशने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. तर पाकिस्तानने साखळी फेरीत एकही सामना जिंकलेला नाही.
