ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरीजसाठी कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग इलेवन

team india : वर्ल्डकपनंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानात सीरीज खेळणार आहे. टी२० सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पहिल्या सामन्यासाठी कशी असेल प्लेईंग इलेव्हन जाणून घ्या.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरीजसाठी कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग इलेवन
team india
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 6:55 PM

वर्ल्डकप नंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांच्या टी-20 मालिका होणार आहे. या टी२० मालिकेचा पहिला सामना हा  23 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचीही सोमवारी रात्री घोषणा करण्यात आली. भारतीय संघात अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हार्दिक पांड्या सध्या दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. वरिष्ठ खेळाडूंनाही विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पांड्याच्या जागी आता टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवकडे टी-20 चे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.  पहिल्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन काय असू शकते याचा अंदाज घेऊया.

कोणत्या खेळाडूंना मिळू शकते संधी

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाचा घोषणा करण्यात आली आहे. 23 नोव्हेंबरपासून सुरु होत असलेल्या या पाच सामन्यांच्या T20 सीरीजसाठी सूर्यकुमार यादव कर्णधार असणार आहे. तर रुतुराज गायकवाड उपकर्णधार असणार आहे. पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रशीद कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार यांना संधी मिळू शकते.

प्लेइंग इलेव्हन काय असू शकते?

सूर्यकुमार यादव (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि प्रसीद कृष्णा. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादवसमोर उरलेले तीन पर्याय अवेश खान, मुकेश कुमार आणि जितेश शर्मा असतील.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिका

पहिला T20 सामना – 23 नोव्हेंबर, संध्याकाळी 7.00 वाजता, विशाखापट्टणम दुसरा T20 सामना – 26 नोव्हेंबर, संध्याकाळी 7.00 वाजता, तिरुवनंतपुरम तिसरा T20 सामना – 28 नोव्हेंबर, संध्याकाळी 7.00 वाजता, गुवाहाटी चौथा T20 सामना – 1 डिसेंबर, संध्याकाळी 7.00 वाजता, नागपूर पाचवा T20 सामना – 3 डिसेंबर, संध्याकाळी 7.00 वाजता, हैदराबाद

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो.
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले...
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले....
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास.
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय.
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय.
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक...
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक....
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर.