AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Tour Of England : इंग्लंड दौऱ्यात गंभीर नाही, हा माजी खेळाडू कोच! फक्त 2 कसोटींचा अनुभव

India Tour Of England 2025 : बीसीसीआय निवड समितीने शुक्रवारी 16 मे रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया ए ची घोषणा केली. निवड समितीने एकूण 20 खेळाडूंना संधी दिली आहे.

India Tour Of England : इंग्लंड दौऱ्यात गंभीर नाही, हा माजी खेळाडू कोच! फक्त 2 कसोटींचा अनुभव
Gautam Gambhir Team India Head CoachImage Credit source: PTI
| Updated on: May 17, 2025 | 9:36 PM
Share

टीम इंडिया आयपीएल 2025 नंतर इंग्लंड दौरा करणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 5 कसोटी सामना खेळवण्यात येणार आहेत. त्याआधी टीम इंडिया ए इंग्लंड लायन्स विरुद्ध 2 सराव सामने खेळणार आहे. तर त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये आपसात एक सामना होणार आहे. या एकूण 3 सामन्यांमुळे टीम इंडियाच्या युवा खेळाडूंचा चांगलाच सराव होणार आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया एसह कोच म्हणून माजी फलंदाज ऋषिकेश कानिटकर असणार आहेत. “कानिटकर यांना खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचा चांगला अनुभव आहे. त्यांचा धोरणात्मक विचार हा टीम इंडिया ए साठी फायदेशीर ठरेल. त्यांच्या मार्गदर्शनामुळे इंग्लंडमधील स्थितीत खेळताना खेळाडूंना फायदा होईल”, असा विश्वास बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

ऋषिकेश कानिटकर यांनी भारताचं 34 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. कानिटकर यांनी वूमन्स क्रिकेटसाठी गेल्या काही वर्षांमध्ये बॅटिंग कोच म्हणून भरीव योगदान दिलं आहे. तसेच कानिटकर 2023 च्या वूमन्स टी 20i वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे बॅटिंग कोच होते.

टीम इंडिया ए 30 मे ते 16 जून दरम्यान एकूण 3 सामने खेळणार आहे. टीम इंडियाच्या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटचा अनुभव मिळावा, हा या सामन्यांच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात 4 दिवसांचे 2 सामने होणार आहेत.

इंडिया ए टीमचं वेळापत्रक

  • इंग्लंड लायन्स विरुद्ध इंडिया ए, 30 मे-2 जून, कँटरबरी
  • इंग्लंड लायन्स विरुद्ध इंडिया ए, 6 ते 9 जून, नॉर्थम्पटन
  • इंट्रा-स्क्वाड मैच, 13 ते 16 जून

इंग्लंड दौऱ्यासाठी अशी आहे इंडिया ए टीम

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया ए : अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, ध्रुव जुरेल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, शार्दूल ठाकुर, ईशान किशन (विकेटकीपर), मानव सुथार, तनुष कोटीयन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कंबोज, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, सर्फराज खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे, शुबमन गिल आणि साई सुदर्शन.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.