AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिंकु सिंहच्या वडीलांच्या अंत्यसंस्काराला मोठी गर्दी, कोहलीसह इतर क्रिकेटपटूंनी व्यक्त केल्या संवेदना

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू असताना रिंकु सिंहवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या वडिलांचे 27 फेब्रुवारीला सकाळी निधन झालं. त्यानंतर रिंकु सराव सोडून चेन्नईहून थेट अलिगढला आला.

रिंकु सिंहच्या वडीलांच्या अंत्यसंस्काराला मोठी गर्दी, कोहलीसह इतर क्रिकेटपटूंनी व्यक्त केल्या संवेदना
रिंकु सिंहच्या वडीलांच्या अंत्यसंस्काराला मोठी गर्दी, कोहलीसह इतर क्रिकेटपटून व्यक्त केल्या संवेदनाImage Credit source: instagram/pti
| Updated on: Feb 27, 2026 | 6:48 PM
Share

टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि फिनिशर रिंकु सिंहच्या कुटुंबात दु:खद घटना घडली. रिंकु सिंहच्या वडिलांचं आजारपणात निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना यकृताचा कर्करोग झाला होता. त्यामुळे रिंकु मध्यंतरी घरी परतला होता. पण त्यांची प्रकृतीत सुधारणा झाल्याचं पाहून पुन्हा एकदा संघासोबत रूजू झाला. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी संघासोबत आला होता. रिंकुला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. पण क्षेत्ररक्षण करत होता. 27 फेब्रुवारी 2026 सकाळी त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर चेन्नईत सराव शिबिरात असलेल्या रिंकु सिंहने थेट घर गाठलं. तसेच वडिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाला. रिंकूने वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला. अंत्ययात्रेत कुटुंब, शेजारी, मित्र आणि स्टार क्रिकेटपटू सहभागी झाले होते.

रिंकु सिंहच्या वडिलांवर ग्रेटर नोएडाच्या यथार्थ रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या वडिलांचे पार्थिव ग्रेटर नोएडाहून अलिगडला पोहोचले. या बातमीने क्रीडाविश्वात शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे. सोशल मीडियावर अनेक जणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच रिंकु सिंहच्या कुटुंबाला दु:ख पचवण्याची ताकद द्यावी, अशी प्रार्थना करत आहेत.

विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरील पोस्टमध्ये लिहिले की, “रिंकूच्या वडिलांच्या निधनाच्या बातमीने मला खूप दुःख झाले आहे. या कठीण काळात माझी मनापासून प्रार्थना आणि संवेदना तुझ्या कुटुंबासोबत आहेत. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला नेहमीच शक्ती देतील. ओम शांती.”

युवराज सिंग यांनी या दु:खद बातमीवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. रिंकु सिंहने शोक व्यक्त करत सांगितले की, या कठीण काळात रिंकु सिंहच्या कुटुंबासोबत आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही रिंकूच्या वडिलांच्या निधनाबद्दल बोर्डाच्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ