AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC Champions Trophy 2025 Streaming : चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने 9 भाषेत, मराठीचा समावेश आहे की नाही?

Icc Champions Trophy 2025 Live And Digital Streaming : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. त्याआधी जाणून घ्या टीम इंडियासह इतर संघांचे सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?

ICC Champions Trophy 2025 Streaming : चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने 9 भाषेत, मराठीचा समावेश आहे की नाही?
icc champions trophy 2025 live and digital streamingImage Credit source: Icc X account
| Updated on: Feb 17, 2025 | 4:19 PM
Share

बहुप्रतिक्षित आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तान आणि दुबईत करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं आयोजन हे 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांमध्ये 15 सामने खेळवण्यात येणार आहेत. तब्बल 8 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. याआधी 2017 साली अखेरीस चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा पाकिस्तानने अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती. तर यंदा या स्पर्धेतील सहभागी 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, बांग्लादेश आणि न्यूझीलंड 4 संघ ए गटात आहेत. तर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा बी ग्रुपमध्ये समावेश आहे. या स्पर्धेतील सर्व सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळतील? हे जाणून घेऊयात.

भारतात जिओस्टार नेटवर्ककडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या प्रसारणाचे अधिकार आहेत. क्रिकेट चाहत्यांना एकूण 9 भाषेत सामन्यांचा थरार अनुभवता येणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, बंगाली, हरियाणवी, भोजपूरी, तमिळ, तेलुगु आणि कन्नडमध्ये स्ट्रीमिंग करण्यात येणार आहे. तसेच जिओ-हॉटस्टारवर एकूण 4 मल्टी कॅम फीड्सद्वारे लाईव्ह सामना पाहायला मिळेल. तसेच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड चॅनेल्सवर सामना लाईव्ह पाहायला मिळेल.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला केव्हापासन सुरुवात?

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला बुधवार 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना गतविजेता-यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.

एकूण किती दिवस रंगणार स्पर्धा?

चॅम्पियन्स ट्रॉफीत एकूण 8 संघांमध्ये 19 दिवसांत 15 सामने होणार आहेत. अंतिम सामना 9 मार्चला होणार आहे.

टीम इंडियाचे सामने टीव्हीवर कुठे पाहायला मिळतील?

टीम इंडियाचे सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील.

टीम इंडियाचे सामने मोबाईलवर कुठे पाहायला मिळतील?

टीम इंडियाचे सामने मोबाईलवर जिओ-हॉटस्टारवर पाहायला मिळतील.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.

Follow Us
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक