Icc Champions Trophy 2025 : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, अफगाणिस्तानकडून 11 जणांचं पदार्पण! प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
Afghanistan vs South Africa Toss CT 2025 : दक्षण आफ्रिकेने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या मोहिमेतील पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील एकूण तिसरा आणि बी ग्रुपमधील पहिला सामना हा 21 फेब्रुवारीला खेळवण्यात येत आहे. या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. सामन्याचं आयोजन हे कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 2 वाजता टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला. कर्णधार टेम्बा बावुमा याने बॅटिंगचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये विस्फोटक फलंदाज हेन्रिक क्लासेन नसल्याचं टेम्बाने स्पष्ट केलं. हेन्रिक नसणं दक्षिण आफ्रिकेसाठी मोठा झटका आहे. दक्षिण आफ्रिका हेन्रिकची उणीव कशी भरुन काढते आणि अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा कसा सामना करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये हेन्रिक क्लासेनव्यतिरिक्त ट्रिस्टन स्टब्स याचाही नाही. तर दक्षिण आफ्रिका फक्त एकमेव स्पिनरसह उतरली आहे. तर इतर सर्व वेगवान गोलंदाज आहेत. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील त्रिसदस्यीय मालिकेतील सामना याच स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हा त्या सामन्यात फिरकी गोलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावली होती. त्यामुळे या सामन्यात फिरकी गोलंदाजांना किती मदत मिळते? याकडेही साऱ्यांचं लक्ष असेल.
अफगाणिस्तानचं चॅम्पियन्स ट्रॉफीत पदार्पण
दरम्यान अफगाणिस्तानचं चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या 11 खेळाडूंचं एकाप्रकारे चॅम्पियन्स ट्रॉफीत पदार्पण झालंय. अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 5 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. अफगाणिस्तानने 2 वेळा विजय मिळवलाय. तर दक्षिण आफ्रिकेने 3 सामन्यात अफगाणिस्तानवर मात केली आहे. एका सामन्याचा अपवाद वगळता दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यामुळे आता स्पर्धेत कोण विजयी सलामी देतं? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
अफगाणिस्तानच्या 11 खेळाडूंचं चॅम्पियन्स ट्रॉफीत पदार्पण
🚨 STARTING XI! 🚨
Here’s our Starting XI for our maiden outing at the ICC #ChampionsTrophy against South Africa. 👍
Go well, Atalano! 🤩#AfghanAtalan | #AFGvSA | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/UgPRLEPanS
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) February 21, 2025
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, सेदीकुल्ला अटल, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, फजलहक फारूकी आणि नूर अहमद.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : टेम्बा बावुमा (कॅप्टन), रायन रिकेल्टन (विकेटकीपर), टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.
