T20 World Cup 2026 Points Table:  भारत पाकिस्तान असलेल्या गटात सुपर 8 फेरीचा गुंता वाढला, एक पराभव असं बदलणार समीकरण

ICC Men’s T20 World Cup 2026 Match Points Table: टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 21व्या सामन्यात अमेरिका आणि नेदरलँड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात अमेरिकेने बाजी मारली. या विजयानंतर गुणतालिकेत उलथापालथ झाली आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. 

T20 World Cup 2026 Points Table:  भारत पाकिस्तान असलेल्या गटात सुपर 8 फेरीचा गुंता वाढला, एक पराभव असं बदलणार समीकरण
भारत पाकिस्तान असलेल्या गटात सुपर 8 फेरीचा गुंता वाढला, एक पराभव असं बदलणार समीकरण
Image Credit source: USA Cricket Twitter
| Updated on: Feb 13, 2026 | 10:31 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या 21व्या सामन्यात अमेरिका आणि नेदरलँड यांची लढत झाली. अमेरिका आणि नेदरलँडचा हा स्पर्धेतील तिसरा सामना होता. या सामन्यात अमेरिके नेदरलँडचा 93 धावांनी धुव्वा उडवला. अमेरिकेने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 196 धावा केल्या. तसेच विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना नेदरलँडचा संघ 15.5 षटकात 103 धावांवरच गारद झाला. या पराभवामुळे नेदरलँडचं नुकसान झालं आहे. तर अमेरिका पुन्हा एकदा शर्यतीत आली आहे. या विजयामुळे अमेरिकेला 2 गुण मिळले आणि नेट रनरेटही चांगला झाला आहे. अमेरिका आणि नेदरलँड या दोन्ही संघांचं आताा गणित जर तरवर असणार आहे. तर नामिबियाचं स्पर्धेतून आऊट झाला नसला तरी शेवटच्या घटका मोजत आहे. एक पराभव होताच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

अमेरिका नेदरलँड हे दोन्ही संघ भारत आणि पाकिस्तान असलेल्या गटात आहेत. त्यामुळे या सामन्याचा निकालाचा गुणतालिकेवर परिणाम होणार यात काही शंका नाही. अमेरिकेच्या विजयानंतर या गटात सुपर 8 फेरीचा गुंता वाढला आहे. भारत पाकिस्तान सामन्यातील विजयी संघ सुपर 8 फेरीत जागा मिळवेल. पण दुसर्‍या संघासाठी जोरदार चुरस होऊ शकते. कारण या सामन्यातील निकालानंतर तसे परिणाम दिसून येत आहे. भारत किंवा पाकिस्तान जो संघ हरेल त्यांचे 4 गुण राहतील. त्यामुळे त्यांना पुढचा सामना जिंकणं भाग आहे. जर त्या सामन्यात पराभव झाला तर मात्र गणित नेट रनरेटवर येईल.

… तर अमेरिका आणि नेदरलँडला संधी

अमेरिकेचा शेवटचा सामना नामिबियाशी आहे. या सामन्यात अमेरिकेने विजय मिळवला तर 4 गुण होतील. नेदरलँडचा शेवटचा सामना भारताशी आहे. त्यामुळे सुपर 8 फेरीच्या दुसऱ्या जागेसाठी जोरदार चुरस असेल. समजा, भारताने पाकिस्तानला पराभूत केलं तर भारत सुपर 8 फेरीत जागा पक्की करेल. तर पाकिस्तान, अमेरिका आणि नेदरलँड यांच्यात दुसऱ्या जागेसाठी लढत असेल. पाकिस्तानने शेवटचा सामना जिंकला तर प्रश्नच येत नाही. पण हा सामना गमावला तर अमेरिका आणि नेदरलँडला नेट रनरेटच्या आधारावर संधी मिळू शकते.