T20 World Cup साठी भारतीय संघाची घोषणा, वाचा BCCI ने नेमका काय निर्णय घेतला?

आगामी टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ संघ बांधणीमध्ये व्यस्त आहे.

T20 World Cup साठी भारतीय संघाची घोषणा, वाचा BCCI ने नेमका काय निर्णय घेतला?
भारतीय टी20 संघ
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 1:48 PM

मुंबई : भारतीय संघ बहुप्रतिक्षीत टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) संपूर्णपणे सज्ज झाला आहे. फक्त आता नेमकं कोणत्या खेळाडूंना अंतिम संघात स्थान मिळतं? हे पाहावं लागणार आहे. दरम्यान InsideSport.co यांच्या रिपोर्टनुसार भारतीय संघाची निवड झाली असून केवळ घोषणा करणं बाकी आहे. विशेष म्हणजे InsideSport ला ही माहिती BCCI च्या एका उच्च अधिकारी आणि  निवड समितीच्या सदस्याकडून मिळाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार निवडकर्त्यांनी विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्याशी चर्चा करुन संघ निवडला आहे. तसेच आज (6 सप्टेंबर) किंवा उद्या अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

याआधी समोर आलेल्या माहितीनुसार BCCI च्या सूत्रांनी सांगितले होते की, टी-20 विश्वचषकासाठीच्या संघाची निवड भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओवलमधील चौथ्या कसोटीनंतर होणार आहे. आज या कसोटीचा शेवटचा दिवस असून आजच या विश्वचषकासाठीच्या अंतिम 15 खेळाडूंची घोषणा आज होऊ शकते.

‘या’ खेळाडूंवर खास नजर

टीम इंडियाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे असून रोहित शर्मा, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव या खेळाडूंची निवड जवळपास निश्चित आहे. पण शिखर धवन, पृथ्वी शॉ, मोहम्मद शमी, दीपक चाहर, युजवेंद्र चहल या खेळाडूंच्या निवडीवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. याशिवाय श्रेयस अय्यर नुकताच दुखापतीतून सावरला असून त्याच्या निवडीवरही सगळ्यांचे लक्ष असेल. तसंच अष्टपैलू हार्दीक पंड्यालाही अनेक पर्याय उपलब्ध असल्याने त्याची निवड होईल की नाही? हा प्रश्नही कायम आहे. पंड्याला सध्या शिवम दुबे, शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर हे तगडे पर्याय उपलब्ध आहेत.

टी-20 विश्व चषकासाठी संभाव्य 15 सदस्यीय संघ :

केएल राहुल, रोहित शर्मा (उप-कर्णधार),विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), भुवनेश्वर कुमार, शिखर धवन

राखीव: वाशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, पृथ्वी शॉ, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा

संबंधित बातम्या 

T20 World Cup Ind vs Pak : टी 20 च्या मैदानात सर्वात मोठा सामना, भारत वि पाकिस्तान मॅचचं टाईम टेबल जाहीर

T20 World Cup 2021 चे ग्रुप जाहीर, भारतासोबत गटात ‘हे’ संघ, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठी माहिती समोर

(ICC t20 world cup 2021 indian team selection will hel today on 6th september says reports)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.