Rohit Sharma च्या एका मेसेजनंतर टीम इंडियाची दिवाळी पार्टी रद्द, सिडनीमध्ये काय घडलं?
टीम इंडियाच्या खेळाडूंनी कुटुंबीयांसह मोठ्या जल्लोषात दिवाळी सेलिब्रेशनच प्लानिंग केलं होतं. मग अचानक काय झालं?

सिडनी: टीम इंडिया सिडनीमध्ये दाखल झाली आहे. सध्या दिवाळी सण सुरु आहे. भारतातच नाही, जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा करतात. टीम इंडियाच्या खेळाडूंनी सुद्धा कुटुंबीयांसह उत्साहात दिवाळी साजरा करण्याचं ठरवलं होतं. मेलबर्नमध्ये पाकिस्तानवर मिळवलेला रोमांचक विजय आणि दिवाळी सण असं दोन्ही गोष्टींच एकत्र सेलिब्रेशन करण्याची योजना होती.
भावनांमध्ये वहावत जाऊ नका
पण हेड कोच राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्मा यांच्याकडून टीमला एक मेसेज देण्यात आला. पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचं मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन करु नका, असा तो संदेश होता. त्यामुळे टीम इंडियाची दिवाळी पार्टी रद्द झाली आहे. भावनांमध्ये वहावत जाऊ नका, मोठ्या लक्ष्यावर लक्ष केंद्रीत करा, असा मेसेज विराट, रोहितकडून देण्यात आला आहे.
मॅच नंतरच्या बैठकीत खेळाडूंना हे सांगण्यात आलय
“पुढच्या सामन्याचा विचार करा. दीर्घकालीन उद्दिष्टय लक्षात ठेवा. चांगली सुरुवात झाली आहे. सातत्य आणि चांगली कामगिरी करायची आहे. स्पर्धा अजून संपलेली नाही. त्यामुळे पाय जमिनीवर ठेवा, मॅच नंतरच्या बैठकीत खेळाडूंना हे सांगण्यात आलय” सपोर्ट स्टाफमधील सूत्राच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलय.
मेलबर्नमधल्या विजयानंतर काय झालं?
सिडनी शहरदेखील भारतीय टीमसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज होतं. टीमचे वरिष्ठ खेळाडू आणि कोचकडून मिळालेल्या मेसेजनंतर टीम इंडियाने ग्रँड दिवाळी पार्टीचा बेत रद्द केलाय. टीम इंडियाचा पुढचा सामना गुरुवारी नेदरलँड विरुद्ध होणार आहे.
पाकिस्तानवर मिळवलेल्या रोमांचक विजयानंतर टीम इंडियावर शुभेच्छाचा वर्षाव सुरु आहे. मेलबर्नमध्ये विजय मिळवल्यानंतर केक कटिंग किंवा बाहेर जाऊन सेलिब्रेशन असं काही झालं नाही. खेळाडू लगेचच हॉटेलमधल्या आपल्या रुमवर परतले. विराट कोहली आणि हार्दिक पंड्याला मीडिया कमिटमेंट असल्यामुळे ते सर्वात शेवटी आपल्या रुममध्ये गेले.
