USA vs IND Toss: यूएसए विरुद्ध टीम इंडियाने टॉस जिंकला, बॅटिंग कुणाची?
United States vs Team India Toss: यूनायटेड स्टेटस विरुद्ध टीम इंडिया दोन्ही संघ आमेनसामने खेळण्याची ही पहिली वेळ आहे. या दोन्ही संघांचा हा आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील तिसरा सामना आहे.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 25 व्या सामन्यात ए ग्रुपमधील यजमान संघ यूएसए विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील तिसरा सामना आहे. दोन्ही संघांनी याआधीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. आता यूएसए आणि टीम इंडिया दोघांना हा सामना जिंकून सुपर 8 मध्ये पोहचण्याची संधी आहे. टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात खेळणार आहे. तर मोनांक पटेल याच्याकडे गुजरातची सूत्रं आहेत. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस पार पडला. टीम इंडियाने टॉस जिंकला. कॅप्टन रोहित शर्मा याने फिल्डिंगचा निर्णय घेत यूएसएला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
टीम इंडिया अनचेंज
टीम इंडियाने यूएसए विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनेमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कॅप्टन रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटने आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. यूएसए विरुद्धच्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोघांच्या जागी यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन या दोघांना संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र ही चर्चा फक्त चर्चाच ठरली आहे.
तर दुसऱ्या बाजूला यजमान यूएसए संघाने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. कॅप्टन मोनांक पटेल हा खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्यामुळे कॅप्टनच्या जागी शायन जहांगीर याला संधी देण्यात आली आहे. तर नॉथुश केंजिगे याला बाहेर बसवत शॅडली व्हॅन शाल्कविक याचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान नियमित कर्णधार मोनांक पटेल याच्या अनुपस्थितीत आरोन जोन्स हा यूएसएचं नेतृत्व करणार आहे.
भारतीय संघाच्या बाजने नाणेफेकीचा कौल
🚨 Toss Update 🚨
Captain Rohit Sharma has won the toss & #TeamIndia have elected to bowl against USA.
Follow The Match ▶️ https://t.co/HTV9sVyS9Y#T20WorldCup | #USAvIND | @ImRo45 pic.twitter.com/WWgfs7NJRT
— BCCI (@BCCI) June 12, 2024
युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: आरोन जोन्स (कर्णधार), स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.
