IND vs SA : संजूला संधी आणि अभिषेकला डच्चू? अखेर निर्णय झालाच, कॅप्टन सूर्या म्हणाला…

India vs South Africa Super 8 Playing 11 : टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर 8 फेरीतील सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असेल? अभिषेकच्या जाणून घ्या संजूला संधी मिळणार का? जाणून घ्या.

IND vs SA : संजूला संधी आणि अभिषेकला डच्चू? अखेर निर्णय झालाच, कॅप्टन सूर्या म्हणाला...
Rinku Sanju Shivam And Axar Patel Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 22, 2026 | 3:33 AM

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 मधील तिसऱ्या सामन्यात रविवारी 22 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा याच्यासाठी विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याला साखळी फेरीतील 3 सामन्यांमध्ये प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर बसावं लागलं. मात्र संजूला बाहेर करुन अभिषेकला संधी देण्याचा काडीचाही फायदा झाला नाही. अभिषेक तिन्ही सामन्यात झिरोवर आऊट झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये संजू सॅमसन याला अभिषेक शर्मा याच्या जागी संधी मिळणार का? हा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. असंख्य क्रिकेट चाहत्यांच्या मनातील प्रश्नांचं उत्तर कर्णधार सूर्यकुमार यादव याने दिलं आहे.

अभिषेक शर्मा साखळी फेरीतील 4 पैकी 3 सामन्यांत खेळला. अभिषेक या तिन्ही सामन्यांत भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. तर अभिषेकला एका सामन्यात तब्येतीमुळे मुकावं लागलं. त्यानंतरही कर्णधार सूर्यकुमार यादव याने अभिषेक त्याच्या जागी कायम असेल, असं स्पष्ट केलं. त्यामुळे संजूला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी मिळणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.

संजूच्या सॅमसनच्या सरावामुळे समावेशाची चर्चा

सामन्याआधी खेळाडू जोरदार सराव करत असतात. साधारणपणे जे खेळाडू प्लेइंग ईलेव्हनचा भाग असतात ते अधिकाअधिक सराव करत असतात. त्यामुळे जे सराव करतायत तेच 11 खेळाडूंमध्ये असणार , असं समीकरण तयार झालं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याआधी संजू सॅमस यानेही सराव केला. त्यामुळे अभिषेकच्या जागी संजूला संधी मिळेल, अशी शक्यता वाढीस लागली. मात्र कर्णधार सूर्यकुमार यादव याने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत काय म्हटलं? जाणून घेऊयात.

संजूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार नसल्याचं सूर्याने म्हटलं. कॅप्टन सूर्याने त्याच्या शैलीत संजूला खेळवण्यावरुन पत्रकारांना उत्तर दिलं. “तुम्ही म्हणताय की मी अभिषेकच्या जागी त्याला (संजू समॅसन) खेळवू?”, असं म्हणत सूर्याने संजूला संधी मिळणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच पत्रकारांनी सूर्याला संजूला तिसऱ्या स्थानी खेळवण्याबाबतही प्रश्न केला. यावर सूर्याने “तर तिलकच्या जागी खेळवू?” असं म्हटलं. त्यामुळे कॅप्टन सूर्याच्या उत्तरावरुन संजूला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह.

Follow Us