ICC Women’s world cup 2022 : आज दक्षिण आफ्रिका- वेस्ट इंडिज आमनेसामने, विंडीजने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय

आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे संघ आमनेसामने आहेत. पावसामुळे सामना रखडला होता.आता सामना  सुरू झाला असून वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.. मागील सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करणाऱ्या दोन्ही संघांना आज कोणत्याही किंमतीवर विजय मिळवायचा आहे. सलग चार विजयानंतर दक्षिण आफ्रिकेला अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.

ICC Women’s world cup 2022 : आज दक्षिण आफ्रिका- वेस्ट इंडिज आमनेसामने, विंडीजने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय
ICC Women’s world cup 2022Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 8:23 AM

आयसीसी महिला विश्वचषक (icc women world cup) स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे (South Africa vs West indies) संघ आमनेसामने आहेत. पावसामुळे सामना रखडला होता.आता सामना  सुरू झाला असून वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करणाऱ्या दोन्ही संघांना आज कोणत्याही किंमतीवर विजय मिळवायचा आहे. सलग चार विजयानंतर दक्षिण आफ्रिकेला अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा पाकिस्तानकडून पराभव झाला. उपांत्य फेरीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. तर पाकिस्तान महिला क्रिकेट संघाला संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत केवळ एकच विजय मिळवता आला आहे. त्याचवेळी गतविजेत्या इंग्लंडने पराभवाची हॅट्ट्रिक साधून शर्यतीत पुनरागमन केले आहे. इंग्लंडचा उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची शेवटची संधी असेल. भारताने बांगलादेशला नमवून विश्वचषकातील तिसऱ्या विजयाची नोंद करताना निव्वळ धावगतीमध्येही 0.768 अशी सुधारणा केली. सहा सामन्यांमध्ये तीन विजयांसह सहा गुण मिळवणारा भारतीय संघ (indian women cricket team) गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे.

भारताचा रेनरेट 0.768

भारताने आतापर्यंत स्पर्धेतील 6 पैकी 3 लढती जिंकल्या आहेत. त्यामध्ये 6+ गुण आहेत. टीम इंडियाने बांगलादेशवर 110 धावांनी मोठा विजय मिळवला त्यामुळे त्यांचे रनरेट देखील चांगले आहे. भारताचे रनरेट प्लस 0.768 इतका असून ते इतरांच्या तुलनेत चांगले आहे. भारताची स्पर्धेत एकच लढत शिल्लक असून ती रविवारी द. आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. टीम इंडियाने रविवारी द.आफ्रिकेचा पराभव केला तर सेमीफायनलमधील स्थान पक्क होईल. अन्य सामन्यांच्या निकालाचा कोणताही परिणाम भारतावर होणार नाही. भारताचे रनरेट चांगले असल्याने दक्षिणआफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांना ते पार करता येणार नाही. आता आज दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजचा पराभव केल्यास भारतासाठी सेमीफायनलचे गणित आणखी सोपे होईल. अशा परिस्थितीत भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला तरी ते सेमीफायनलमध्ये पोहचू शकतील. कारण, तेव्हा गुणतक्त्यात भारत, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या तिनही संघांचे प्रत्येकी 6 गुण होतील. इंग्लंडने पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध विजय मिळले तर त्यांचे ८ गुण होतील. भारताचे नेट रनरेट चांगले असल्याने ते न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजच्या पुढे असतील.

भारत तिसऱ्या स्थानावर

भारताने बांगलादेशला नमवून विश्वचषकातील तिसऱ्या विजयाची नोंद करताना निव्वळ धावगतीमध्येही 0.768 अशी सुधारणा केली. सहा सामन्यांमध्ये 3 विजयांसह सहा गुण मिळवणारा भारतीय संघ गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारताची रविवारी अखेरची साखळी लढत आफ्रिकेविरुद्ध आहे. या सामन्यात भारताला विजय अत्यावश्यक आहे. त्याआधी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावरील आफ्रिकेचा आज आणखी एक सामना आहे. या सामन्यात आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवल्यास भारताची उपांत्य फेरी गाठण्याची संधी वधारेल. याचप्रमाणे इंग्लंडसुद्धा शर्यतीत आहे.

भारताचा विश्वचषकातील प्रवास

  1. पाकिस्तानविरुद्ध 107 धावांनी विजय
  2. न्यूझीलंडविरुद्ध 62 धावांनी पराभव
  3. वेस्ट इंडिजविरुद्ध 155 धावांनी विजय
  4. इंग्लंडविरुद्ध 4 विकेटनी पराभव
  5. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 विकेटनी पराभव
  6. बांगलादेशविरुद्ध 110 धावांनी पराभव

इतर बातम्या

Instagram सुपरस्टार होण्यासाठी यूपीहून मुंबईला, दोन अल्पवयीन मुली वसईत सापडल्या

प्रतीकशी साखरपुडा केल्यानंतर हृताला आला वाईट अनुभव; चाहत्यांना विनंती करत म्हणाली..

Zodiac | संपला विषय ! शब्द दिला की पाळणारच, अत्यंत निष्ठावान असतात या 4 राशी, जोडीदाराच्या शोधात असाल तर यांचा नक्की विचार करा

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.