AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs NEDW : वुमन्स टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, नेदरलँड्सचा 95 धावांनी धुव्वा

India vs Netherlands Womens Match Result : वुमन्स टीम इंडियासाठी नेदरलँड्स विरुद्धचा विजय खास आणि ऐतिहासिक ठरला. भारताने पहिल्यांदाच या स्पर्धेत 200 धावा केल्या. तसेच धावांबाबत भारताचा हा स्पर्धेतील सर्वात मोठा विजय ठरला.

INDW vs NEDW : वुमन्स टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, नेदरलँड्सचा 95 धावांनी धुव्वा
Richa Shafali Team IndiaImage Credit source: bcci women X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 17, 2026 | 11:07 PM
Share

आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियाने विजयी घोडदौड यशस्वीरित्या कायम राखली आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात सलग आणि एकूण दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने पाकिस्ताननंतर आता नदरलँड्सवर मात केली आहे.  भारतीय महिला संघाने नेदरलँड्सचा 95 धावांनी धुव्वा उडवला आहे. भारताने शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या दोघींनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर नेदरलँड्ससमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर नेदरलँड्सला संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारताने नेदरलँड्सला 17.3 ओव्हरमध्ये 114 धावांवर गुंडाळलं. भारताने यासह 2 गुणांची कमाई केली आणि सामना जिंकला.

भारताची बॅटिंग

नेदरलँड्सने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताने या संधीचं सोनं केलं. भारताने या स्पर्धेतील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. तसेच भारताने स्पर्धेत पहिल्यांदाच 200 पार मजल मारली. भारताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 209 धावा केल्या. भारतासाठी स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या दोघींनी सर्वाधिक धावा केल्या. उपकर्णधार स्मृती मंधाना हीने सर्वाधिक 74 धावा केल्या. तर शफालीने 55 रन्स केल्या. तर इतरांनीही योगदान दिलं. त्यामुळे भारताला 200 पार पोहचता आलं.

नेदरलँड्सचा 95 धावांनी धुव्वा

नेदरलँड्सच्या पहिल्या 4 फलंदाजांनी विजयी धावांचा पाठलाग करताना ठीक सुरुवात केली. नेदरलँड्सच्या पहिल्या 4 फलंदाजांनी दुहेरी आकड्यात धावा केल्या. मात्र यापैकी एकीलाही 30 पार पोहचता आलं नाही.  त्यानंतर उर्वरित फलंदाजांचा भारतीय गोलंदाजांनी गेम केला.भारतीय गोलंदाजांनी इतर उर्वरित फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठून दिला नाही.

श्री चरणीचा विकेट्सचा चौकार

टीम इंडियासाठी श्री चरणी हीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. श्रीने या 4 पैकी 3 विकेट्स या एकाच ओव्हरमध्ये घेतल्या.  तसेच शफाली वर्मा हीने बॅटिंगनंतर बॉलिंगनेही योगदान दिलं. शफाली वर्मा हीने तिघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. नंदनी शर्माने 2 विकेट्स मिळवल्या. तर दीप्ती शर्मा हीने 1 विकेट घेत योगदान दिलं. दीप्ती या एका विकेटसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणारी पहिली गोलंदाज ठरली.

भारतीय महिला संघाचा सलग दुसरा विजय

टीम इंडियाचा सर्वात मोठा विजय

दरम्यान टीम इंडियाचा हा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील धावांबाबत सर्वात मोठा विजय ठरला. भारताने याआधी श्रीलंकेवर दुबईत 2024 साली 82 धावांनी मात केली होती.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी