AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NED : स्मृती मंधानाचं सलग दुसरं शतक, हरमनप्रीत कौरचा महारेकॉर्ड उद्धवस्त

Most Fifty By India in Womens T20i World Cup : स्मृती मंधाना हीने आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सलग दुसरं अर्धशतक झळकावलं. स्मृतीने यासह भारतासाठी मोठा विक्रम केला. जाणून घ्या.

IND vs NED : स्मृती मंधानाचं सलग दुसरं शतक, हरमनप्रीत कौरचा महारेकॉर्ड उद्धवस्त
Smriti Mandhana Team IndiaImage Credit source: bcci women X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 17, 2026 | 10:36 PM
Share

वुमन्स टीम इंडियाची स्टार ओपनर बॅट्समन आणि उपकर्णधार स्मृती मंधाना हीने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपल्या सलग दुसऱ्या सामन्यात धमाका कायम ठेवत चाबूक खेळी केली आहे. स्मृतीने हेडिंग्ले लीड्समध्ये आयोजित सामन्यात खणखणीत खेळी केली. स्मृतीने भारतासाठी सर्वाधिक 74 धावा केल्या. स्मृतीने या दरम्यान अर्धशतक लगावताच मोठा रेकॉर्ड ब्रेक केला. स्मृतीने सहकारी-कर्णधार हरमनप्रीत कौर आणि माजी फलंदाज मिताली राज या दोघींचा विक्रम मोडीत काढला.

भारताची जबरदस्त सुरुवात

शफाली वर्मा आणि स्मृती या दोघींनी भारताला जबरदस्त सुरुवात मिळवून दिली. दोघींनी 11.4 ओव्हरमध्ये 115 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. शफाली वर्माच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. शफालीने 55 धावा केल्या. शफालीनंतर स्मृतीने वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील सलग दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. स्मृतीने 36 बॉलमध्ये 6 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने हे अर्धशतक झळकावलं. स्मृतीचं हे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील एकूण सहावं अर्धशतक ठरलं. स्मृती यासह भारताकडून या स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकं करणारी महिला फलंदाज ठरली. स्मृतीने याबाबत हरमनप्रीत आणि मिताली या दोघींना मागे टाकलं.

पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक

स्मृतीने 14 जूनला पाकिस्तान विरुद्ध 44 चेंडूत 68 धावा केल्या होत्या. स्मृतीने यासह हरमनप्रीत आणि मितालीच्या विक्रमाची बरोबरी केली होती. तर आता स्मृतीने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

स्मृती मंधाना हीची शतकाची संधी हुकली

स्मृतीची सलग दुसऱ्या सामन्यात शतक करण्याची संधी हुकली. स्मृती दोन्ही सामन्यात अर्धशतकाचं रुपांतर शतकात करण्यात अपयशी ठरली. स्मृती पाकिस्तान विरुद्ध 68 धावांवर बाद झाली. तर स्मृतीने नेदरलँड्स विरुद्ध 74 धावा केल्या. स्मृतीने या खेळीत 11 चौकारांसह आणि 1 षटकारही लगावला.

उपकर्णधार स्मृती मंधानाचं सलग दुसरं अर्धशतक

स्मृतीच्या भारताकडून सर्वाधिक धावा

दरम्यान स्मृती वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी विराजमान आहे. स्मृतीच्या नावावर 2 सामन्यांनंतर एकूण 142 धावा आहेत.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी