SA W vs IND W Final : दक्षिण आफ्रिकेसमोर 299 रन्सचं टार्गेट, टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार?
India vs South Africa Women 2025 Final 1st Inning : टीम इंडियाच्या सलामी जोडीने अंतिम सामन्यात झोकात सुरुवात केली. मात्र भारतीय संघ या डावाचा अपेक्षित शेवट करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे भारताला 300 धावांपर्यंत पोहतचा आलं नाही.

आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 299 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. भारताच्या स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. मात्र त्यानंतरही भारतीय संघ 50 ओव्हरमध्ये 300 धावांपर्यंत पोहचण्यात अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चिवट गोलंदाजी करत भारताला 50 ओव्हरमध्ये 7 झटके देत 298 रन्सवर रोखलं. भारतासाठी शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा या दोघींनी अर्धशतकी खेळी केली. भारताची अप्रतिम सुरुवात झाली. मात्र भारतीय संघ आपल्या या खेळीचा शेवट अपेक्षित करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे आता भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 298 धावांचा यशस्वी बचाव करत वर्ल्ड चॅम्पियन होणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
टीम इंडियाची बॅटिंग
टीम इंडियाच्या पहिल्या 7 फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली. त्यापैकी शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा या दोघींची अपवाद वगळता इतरांना त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. त्यामुळे टीम इंडिया चांगल्या सुरुवातीनंतरही 330-350 धावांचा टप्पाही गाठण्यात अपयशी ठरली.
शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलमी जोडीने भारताला खणखणीत सुरुवात करुन दिली. या दोघींनी शतकी भागीदारी केली. शफाली-स्मृतीने 104 धावा जोडल्या. मात्र स्मृती आऊट होताच ही जोडी फुटली. स्मृतीने 45 धावा केल्या. त्यानंतर जेमीमा रॉड्रिग्सने शफालीला चांगली साथ दिली. तर शफालीही चांगली खेळत होती. शफाली शतकाच्या दिशेने कूच करत होती. मात्र शफाली शतकाच्या 13 धावांआधी आऊट झाली. शफालीने 78 बॉलमध्ये 87 रन्स केल्या. शफालीने जेमीमासह दुसऱ्या विकेटसाठी 62 रन्सची पार्टनरशीप केली.
शफालीनंतर कॅप्टन हरमनप्रीत कौर मैदानात आली. दक्षिण आफ्रिकेने भारताला 5 धावांनंतर तिसरा झटका दिला. जेमीकडून सेमी फायनलसारख्या मोठ्या खेळीची आशा होती. मात्र जेमी अंतिम सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. जेमीने 24 रन्स केल्या. त्यानंतर दीप्ती शर्मा आणि हरमनप्रीत या जोडीने चांगलाच जम बसवला होता. या दोघींनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे या जोडीकडून अनेक आशा होत्या. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताला चौथा आणि मोठा झटका दिला. हरमनप्रीत 20 धावांवर बाद झाली.
त्यानंतर अमनजोत कौर हीने 12 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. रिचा घोष हीने अखेरच्या क्षणी फटकेबाजी केली आणि 34 धावांचं योगदान दिलं. दीप्ती शर्मा हीने अर्धशतकी खेळी केली. मात्र दीप्ती अखेरच्या क्षणी गिअर बदलण्यात अपयशी ठरली. दीप्तीने 58 बॉलमध्ये 58 रन्स केल्या. तर राधा यादव 3 रन्सवर नॉट आऊट राहिली. तर दक्षिण आफ्रिकेसाठी अयाबोंगा खाका हीने 3 विकेट्स घेतल्या. तर तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
