AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc World Cup 2023 साठी टीममध्ये अचानक बदल, या खेळाडूची एन्ट्री

Icc World Cup 2023 Squad Change | क्रिकेट चाहत्यांना आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच वेध लागलं आहे. या स्पर्धेच्या काही दिवसांआधी टीममधून स्टार ओपनरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

Icc World Cup 2023 साठी टीममध्ये अचानक बदल, या खेळाडूची एन्ट्री
IND VS ENG
| Updated on: Sep 17, 2023 | 11:05 PM
Share

मुंबई | टीम इंडियाने श्रीलंका क्रिकेट टीमवर 10 विकेट्सने मात करत आशिया कप 2023 ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने तब्बल 5 वर्षांनी आशिया कप उंचावला. आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कपपूर्वी 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलियाने या वनडे सीरिजसाठी टीमची घोषणा केली आहे. तर लवकरच बीसीसीआयही टीम इंडियाची घोषणा करणार आहे. या सीरिजसाठी टीम इंडियात वर्ल्ड कप संघातील खेळाडूंनाच संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

टीममध्ये मोठा बदल

त्याआधी क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कपसाठी इंग्लंड क्रिकेटने टीममध्ये 1 बदल केला आहे. इंग्लंड क्रिकेट आणि आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. इंग्लंडने न्यूझीलंड विरुद्ध 4 सामन्यांची मालिका 3-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. त्यानंतर इंग्लंडने टीममध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडने 16 ऑगस्ट रोजी वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर केली होती. इंग्लंडने जेसन रॉय याला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवलाय. तर त्याजागी वर्ल्ड कप टीममध्ये हॅरी ब्रूक याचा समावेश केला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच या निर्णयाबाबत  सोशल मीडियावर संमिक्ष प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

“आम्ही निवडलेल्या टीमबद्दल आम्हाला विश्वास आहे जी वर्ल्ड कप जिंकून देऊ शकते. आम्ही भाग्यवान आहोत की आमच्याकडे शानदार टीम आहे. याच टीमने न्यूझीलंड सारख्या संघाविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली आहे”, असं इंग्लंड निवड समितीचे अध्यक्ष ल्यूक राईट म्हणाले.

टीम मॅनेजमेंटच्या निर्णयामुळे क्रिकेट चाहचे नाराज

दरम्यान आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सलामीच्याच सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी सुधारित इंग्लंड टीम | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), मोईन अली, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, बेन स्टोक्स, रीस टॉप्ले, डेविड विली, मार्क वुड आणि क्रिस वोक्स.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.