CWC 23 ENG vs NZ | पहिल्या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांची पाठ, जगातील सर्वात मोठं स्टेडियम रिकामी
England vs New Zealand Empty Stadium | बीसीसीआयने आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी मोठी तयारी केली. मात्र बीसीसीआयला क्रिकेट चाहत्यांना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेचता आलं नाही. पहिल्याच सामन्यात स्टेडियम रिकामी असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये वर्ल्ड कपबाबत निरुत्साह असल्याचं स्पष्ट होतंय.

अहमदाबाद | आयसीसीच्या 13 व्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. वनडे वर्ल्ड कप 2023 च्या सलामीच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन जगातील सर्वात मोठं स्टेडियम असा बहुमान मिळवणाऱ्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या पहिल्या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण होतं. भारतात वर्ल्ड कप होत असल्याने क्रिकेट चाहते सज्ज होते. वर्ल्ड कप सामन्यांच्या तिकीटासाठी चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यामुळे उद्घाटनाच्या सामन्यात मोठ्या संख्येत चाहते उपस्थित राहतील अशी आशा बीसीसीआयला होती.
मात्र बीसीसीआयचा हिरमोड झाला आहे. पहिल्याच सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांनी पाठ दाखवली आहे. या सामन्यात मोठ्या प्रमाणात चाहते येतील, सामना पाहतील, असा अंदाज होता. मात्र तसं झालं नाही. या क्रिकेट स्टेडियमची क्षमता ही 1 लाख 32 हजार इतकी आहे. मात्र या सामन्याला 32 हजार क्रिकेट चाहते नसल्याचं म्हटलं जात आहे. सलामीच्या सामन्याला चाहत्यांनी गैरहजेरी लावल्याने बीसीसीआय उघडी पडली आहे. तसेच बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यावरही टीका केली जात आहे.
स्टेडियम रिकामी का?
पहिल्या सामन्यासाठी चाहत्यांना स्टेडियमच्या दिशेने ओढण्यात बीसीसीआयला अपयश आलं. विशेष म्हणजे 1 हजार रुपयांपेक्षा तिकीटाचे दर कमी होते. सामन्यादरम्यान तिकीट विक्री सुरु होती. मात्र सामन्याआधी कोणत्याही उद्घाटन कार्यक्रम नव्हतं. तसेच रंगारंग कार्यक्रमही एक दिवसआघी झाला नाही. त्यामुळे चाहत्यांनी पाठ फिरवली. सोशल मीडियावर नरेंद्र मोदी स्टेडियममधील रिकाम्या खुर्च्यांचे फोटो आणि व्हीडिओ व्हायरल झाले आहेत.
दरम्यान या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकला. कॅप्टन टॉम लॅथम याने इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आता न्यूझीलंडचे गोलंदाज इंग्लंडला किती धावांपर्यंत रोखतात, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
क्रिकेट चाहत्यांची पाठ
Wheres the crowd for this World Cup opener?#WorldCup #ENGvsNZ #CricketWorldCup2023 #NZvENG #CricketTwitter #NarendraModiStadium pic.twitter.com/NDTCgTEqKW
— STRAIGHT DRIVE (@HamzaSiddiqui56) October 5, 2023
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरान, ख्रिस वोक्स, आदिल रशीद आणि मार्क वुड.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री आणि ट्रेन्ट बोल्ट.
