AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final 2023 साठी कशी असेल टीम इंडियाची Playing 11, रोहित शर्मा ‘या’ खेळाडूंच मोडणार मन

WTC Final 2023 : टीम इंडियाकडून खेळताना तिघांनी स्वत:ला सिद्ध केलय. पण काहीवेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्ध फायनलमध्ये त्या तिघांना बाहेर बसवू शकतो. टीम इंडिया 7 जूनपासून इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध फायनल खेळणार आहे.

WTC Final 2023 साठी कशी असेल टीम इंडियाची Playing 11, रोहित शर्मा 'या' खेळाडूंच मोडणार मन
WTC final 2023 Ind vs AusImage Credit source: twitter
| Updated on: Jun 01, 2023 | 8:28 AM
Share

लंडन : टीम इंडिया 7 जूनपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. इंग्लंडच शहर लंडन येथे केनिंगटन ओव्हल मैदानात भारत-ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. भारताने 10 वर्षापूर्वी शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मागच्या 10 वर्षापासूनचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल. WTC 2023 ची ट्रॉफी जिंकण हे टीम इंडियाच सर्वात मोठ टार्गेट असेल. कॅप्टन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्ध WTC फायनलमध्ये आपली बेस्ट प्लेइंग इलेव्हन उतरवेल.

रोहितला फायनलसाठी प्लेइंग इलेव्हन निवडताना काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे काही खेळाडूंच मन मोडेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडिया कुठल्या प्लेइंग इलेव्हनसह उतरणार, त्यावर एकदा नजर मारुया.

ओपनिंगला कोण येणार?

इंग्लंडच्या केनिंगटन ओव्हल मैदानात रोहित शर्मासोबत शुभमन गिल ओपनिंगला येईल. गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आयपीएल 2023 मध्ये 890 धावा केल्या आहेत. केएल राहुल नसल्यामुळे शुभमन गिलच ओपनिंगसाठी पहिली पसंत आहे.

टीम इंडियाकडून मिडल ऑर्डरमध्ये कोण?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध WTC फायनलमध्ये चेतेश्वर पुजारा नंबर 3 वर बॅटिंगसाठी येईल. विराट कोहली नंबर 4 आणि अजिंक्य रहाणे 5 व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी उतरेल. अजिंक्य रहाणेकडे 2014, 2018 आणि 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर टेस्ट खेळण्याचा अनुभव आहे. अजिंक्य रहाणेसारखा प्लेयर मीडल ऑर्डरमध्ये खेळणार असेल, तर त्यामुळे टीम इंडियाच अधिक मजबूत होईल. नुकत्याच संपलेल्या आयपीएलच्या 16 व्या सीजनमध्ये त्याने सुद्धा दमदार कामगिरी केली होती.

भरत की इशान, रोहित कोणाला संधी देणार?

लोअर मिडल ऑर्डरमध्ये नंबर 6 वर ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा येईल. गोलंदाजी बरोबर बॅटिंगमध्ये सुद्धा जाडेजा उपयुक्त कामगिरी करु शकतो. कॅप्टन रोहित शर्मा 7 व्या स्थानावर इशान किशनला उतरवू शकतो. रोहित विकेटकीपर फलंदाज केएस भरला ड्रॉप करु शकतो. अलीकडे भरतने फ्लॉप कामगिरी केलीय. विकेटकीपिंगमध्ये सुद्धा भरत तितका खास नाहीय. टेस्ट मॅचमध्ये विकेटकीपिंग केल्यानंतर 7 व्या नंबरवर बॅटिंग करण कुठल्याही विकेटकीपरसाठी सोपं नसतं. त्यामुळे इशान किशन 7 व्या नंबरवर बॅटिंग आणि विकेटकीपिंग दोन्ही भूमिका अदा करेल.

ते दोघे ऑस्ट्रेलियासाठी मोठा धोका

WTC फायनलमध्ये कॅप्टन रोहित शर्मा एकमेव स्पिनर म्हणून रविचंद्रन अश्विनला प्लेइंग इलेव्हनधमये संधी देऊ शकतो. केनिंगटन ओव्हलची विकेट स्पिनर्सना अनुकूल मानली जाते. त्यामुळे या पीचवर अश्विन आणि जाडेजा ऑस्ट्रेलियन टीमसाठी मोठा धोका आहेत. रोहित बाहेर कोणाला बसवणार?

फायनलमध्ये रोहित शर्मा वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज या तिघांना उतरवेल. या तिघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट या तिघांना बाहेर बसाव लागेल. शमी आणि सिराज दोघे फॉर्ममध्ये आहे. IPL 2023 मध्ये त्यांनी जबरदस्त प्रदर्शन केलय.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.