ICC WTC Final : मैदानातच थंडीने कुडकडू लागला विराट कोहली, सोबत असलेल्या रोहितची रिएक्शन पाहाच

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (WTC Final) इंग्लंडच्या साऊदम्पटन मैदानात सुरु आहे. त्याठिकाणी अत्यंत थंड वातावरण असल्याने खेळाडूंना खेळताना अडचणी येत आहेत.

ICC WTC Final : मैदानातच थंडीने कुडकडू लागला विराट कोहली, सोबत असलेल्या रोहितची रिएक्शन पाहाच
virat sharma video

साऊदम्पटन : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामन्यात (WTC Final) भारत तोडीस तोड उत्तर देत आहे. इंग्लंडच्या साऊदम्पटन मैदानात सुरु असलेल्य सामन्यात दोन्ही संघाचे खेळाडू विजयासाठी जीवाचे रान करत आहेत. दरम्यान मैदानातील वातावरण थंड असल्याने सर्वच खेळाडू थंडीचा सामना करत खेळत आहेत. दरम्यान भारताचा कर्णधार विराटला (Virat Kohli) देखील थंडी आवरत नसल्याने तो मैदानातच कुडकूडू लागला आहे. त्याचा हा व्हिडीओ आणि त्यावर शेजारी उभा असलेल्या रोहित शर्माची रिएक्शन हा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (ICC WTC Final Southampton Freezing Weather Virat Kohli and Rohit Sharma Funny Reaction Viral)

विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही जेव्हा यष्टीरक्षकाशेजारी क्षेत्ररक्षण करत होते तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. ज्यात सर्वात आधी विराट थंडीने कुडकुडताना दिसतो ज्यावर रोहित भन्नाट रिएक्शन देऊन कोहलीची मजा घेऊ पाहतो. दरम्यान या व्हिडीओला पाहून कळते की मैदानातील वातावरण किती थंड असेल. न्यूझीलंडचे खेळाडू पॅव्हेलियनमध्ये बसून देखील थंडीपासून बचावासाठी अंगावर टॉवेल ओढून बसल्याचे दिसत आहे. मात्र अशा हवामानातही भारतीय संघ उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत असून शुभमनने घेतलेला झेल याचीच साक्ष देतो.

Shubman Gill diving catch

शुभमनने घेतलेला उत्कृष्ट झेल

हे ही वाचा :

WTC Final : ‘सुपरमॅन’ शुभमन, चित्त्यासारखी झेप घेत पकडला झेल, सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस

ICC WTC Final : 196 ओव्हर ठरवणार विजेता, जाणून घ्या कोणता संघ होणार विजयी

WTC Final 2021 : फायनल सामना ड्रॉ झाला तर भारताला मोठं नुकसान, न्यूझीलंड फायद्यात!

(ICC WTC Final Southampton Freezing Weather Virat Kohli and Rohit Sharma Funny Reaction Viral)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI