आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात असं झालं तर आरसीबी प्लेऑफमधून बाहेर! कसं काय ते गणित समजून घ्या
आयपीएल 2025 स्पर्धेची प्लेऑफची शर्यत आता अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत 16 गुण मिळाले की प्लेऑफचं स्थान पक्कं होत होतं. पण यंदाच्या आयपीएल स्पर्धेत स्थिती काही वेगळीच आहे. कारण 16 गुण मिळवणं टॉपच्या चार संघांना सहज शक्य आहे. त्यामुळे टॉपला असलेल्या आरसीबीचं स्थानही डामाडौल आहेत.

आयपीएल 2025 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत 55 सामन्यांचा खेळ संपला आहे. चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. पण अजूनही प्लेऑफमधील चार संघांचं काहीच निश्चित झालेलं नाही. अजूनही सात संघांमध्ये सात संघांमध्ये चार जागांसाठी चुरस आहे. त्यामुळे प्रत्येक सामना हा महत्त्वाचा आहे. प्रत्येक जय पराजयाचा गुणतालिकेवर प्रभाव दिसून येणार आहे. सध्या आयपीएल गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अव्वल स्थानी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 11 पैकी 8 सामने जिंकले असून गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 16 गुण मिळवूनही अधिकृतरित्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवलेलं नाही. याचे मुख्य कारण म्हणजे इतर सात संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. विशेषतः चार संघांना आरसीबीला मागे टाकून प्लेऑफमध्ये पोहोचण्याची चांगली संधी आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू याचे पुढील तीन सामने लखनौ सुपरजायंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्याशी होत आहे. जर या तीन संघांविरुद्ध पराभूत झाले तर त्यांचे 16 गुण राहतील. आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल आणि पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांना पुढील टप्प्यात प्रवेश मिळेल. म्हणूनच आरसीबी संघासाठी पुढील सामने महत्त्वाचे आहेत.
आरसीबी तीन सामन्यात पराभूत झाला तर या संघांना संधी?
- मुंबई इंडियन्सने त्यांच्या पुढील तीन सामन्यांमध्ये गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला तर ते एकूण 20 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचतील.
- पंजाब किंग्सने तीन सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांना हरवल्यास 19 गुणांसह प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करतील.
- गुजरात टायटन्सने लखनौ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांना पराभूत केल्यास एकूण 18 गुणांसह प्लेऑफसाठी पात्रता मिळवेल.
- दिल्ली कॅपिटल्सचा पुढील तीन सामने पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्सशी आहे. या तिन्ही सामन्यात विजय मिळवला तर 19 गुण होतील आणि टॉप 4 मध्ये जागा मिळवू शकते.
