Kapil Dev यांचं रोहित शर्मा, विराट कोहलीबद्दल धक्कादायक विधान

दीनानाथ मधुकर परब, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 03, 2023 | 3:30 PM

Kapil Dev: कपिल देव स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. याआधी सुद्धा कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंबद्दल केलेल्या विधानांवरुन वाद झाला आहे.

Kapil Dev यांचं रोहित शर्मा, विराट कोहलीबद्दल धक्कादायक विधान
Rohit-Virat

मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या संक्रमणाचा काळ सुरु आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली आता टी 20 मालिकांमध्ये फारसे दिसणार नाहीत. यावर्षी भारतात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. त्यानंतर वनडेमध्येही रोहित-विराट फारसे दिसणार नाहीत. याचं कारण आहे, त्यांचं वाढतं वयं. मागच्या 10 वर्षांपासून रोहित आणि विराट भारतीय क्रिकेटचे आंधारस्तंभ होते. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये टॉप 10 फलंदाजांमध्ये अजूनही त्यांचा समावेश होतो.

आता बऱ्याच गोष्टी बदलल्यात

पण आता बऱ्याच गोष्टी बदलल्यात. त्यांच्या बॅटमधून पहिल्यासारखा धावा येत नाहीत. अनेक युवा खेळाडू संधीच्या प्रतिक्षेत आहेत. भारताच्या 1983 सालच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचे कॅप्टन कपिल देव यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा फॉर्म लक्षात घेऊन एक विधान केलय. “कोहली आणि रोहितच्या बळावर वर्ल्ड कप विजयाच्या अपेक्षा ठेवल्या नाहीत, तर चांगलं होईल” असं कपिल देव यांनी म्हटलय.

वर्ल्ड कप जिंकून देणारी टीम आपल्याकडे आहे?

“तुम्हाला वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर कोच, सिलेक्टर्स आणि टीम मॅनेजमेंटला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. व्यक्तीगत हित बाजूला ठेवावं लागेल. टीमचा विचार करावा लागेल” असं कपिल देव यांनी सांगितलं. “विराट, रोहित किंवा 2-3 खेळाडूंवर तुम्ही वर्ल्ड कप विजयासाठी विसंबून रहाल, तर असं कधी होणार नाही. तुम्ही तुमच्या टीमवर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्याकडे अशी टीम आहे का? हो, अशी टीम आहे. काही मॅच विनर्स आहेत का? हो, आहेत, आपल्याकडे असे प्लेयर्स आहेत, जे वर्ल्ड कप जिंकून देऊ शकतात” असं कपिल देव एका वृत्तवाहिनीवर म्हणाले.

रोहितने किती वर्षापासून वनडेत सेंच्युरी झळकवलेली नाही

रोहित सध्या तिन्ही फॉर्मेटचा अधिकृत कॅप्टन आहे. त्याने मागच्या दोन वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सेंच्युरी झळकवलेली नाही. मागच्या महिन्यात बांग्लादेश विरुद्ध विराट कोहलीने तिसरी सेंच्युरी झळकवली. मागच्या तीन वर्षांपासून तो वनडे शतकाच्या प्रतिक्षेत होता. रोहित आणि विराटने त्यांचं काम केलय. आता युवा खेळाडूंनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असं कपिल देव म्हणाले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI