AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CPL 2021 : हवेमध्ये उडत पकडला झेल, प्रत्येक क्रिकेटप्रेमीने पाहावा असा VIDEO

कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये दररोज काहीतरी रोमहर्षक घडत आहे. कधी पोलार्डचा पंचाशी वाद, तर कधी ब्राव्हो आणि हीटमायरमधील मजेशीर क्षण. नुकत्याच झालेल्या सामन्यातही एका खेळाडूने पकडलेल्या कॅचचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

CPL 2021 : हवेमध्ये उडत पकडला झेल, प्रत्येक क्रिकेटप्रेमीने पाहावा असा VIDEO
अकील हुसैन
| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 7:03 PM
Share

मुंबई : इंडियन प्रिमीयर लीगपूर्वी (IPL 2021) सध्या क्रिकेट रसिक कॅरेबियन प्रीमियर लीगचा (CPL) आनंद लुटत आहेत. भारतीय खेळाडू नसले तरी इतर देशांचे धाकड खेळाडू या लीगमध्ये खेळत असल्याने या सामन्यांमध्ये बरेच रोमहर्षक क्षण घडत असतात. उत्कृष्ट क्रिकेटसह काही अशाही घटना घडतात, ज्यामुळे प्रेक्षकांचं मनसोक्त मनोरंजन होत आहे. अशाच एका प्रसंगाचे प्रेक्षक त्रिनिबागो नाइट रायडर्स (Trinibago Knight Riders) विरुद्ध गयाना एमेजॉन वॉरियर्स (Guyana Amazon Warriors) सामन्यादरम्यान साक्षीदार झाले.

रायडर्सचा खेळाडू अकील हुसैन (Akeal Hossain) एक अप्रतिम झेल घेत सर्वांचीच मनं जिंकली. वारियर्सचा संघ नाइट रायडर्सच्या 139 धावांचा पाठलाग करत होता. त्यावेळी  18 व्या ओव्हरमध्ये रवि रामपालने वॉरियर्सचा कर्णधार  निकोलस पूरनला ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला. पूरनने उत्कृष्ट फटका खेचत षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या हुसैनने अगदी सुपरहिरोप्रमाणे हवेत उडी घेतल झेल पकडला. इतकच नाही त्याने झेल पकडताच त्याचा तोल सीमारेषेवर गेला असता पण त्याने अप्रतिमपणे तोल सावरत षटकार जाण्यापासून तर रोखलाच आणि पूरनला बादही केले.

सामना मात्र निसटला

दोन्ही संघाच्या अप्रतिम खेळामुले सामना अत्यंत चुरशीचा झाला. सामना अगदी सुपर ओव्हरपर्यंत गेला.  सर्वात आधी नाइट रायडर्सने  20 ओव्हरमध्ये  138 रन केले. ज्यानंतर वॉरीयर्स संघानेही हा स्कोर केला. ज्यामुळे विजेता निवडण्यासाठी सुपर ओव्हर खेळवली गेली. ज्यात गयाना एमेजॉन वॉरियर्सचा संघ विजयी झाला.

हे ही वाचा

भारतीय संघाकडून सलामीचा सामना, मग पाकिस्तान संघातून खेळला, भारताला पराभूत करण्यातही मोठा वाटा

CPL च्या सामन्यात पंचावर भडकला पोलार्ड, राग व्यक्त करण्यासाठी मैदानात केले असे काही, पाहा VIDEO

(In CPL akeal hosein takes brilliant catch for trinbago knight riders against guyana amazon worriors)

Follow Us
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय