AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया 192 रन्सने आघाडीवर, कांगारुंचं दुसऱ्या दिवशी कमबॅक

India A Women vs Australia A Women unofficial test day 2 Stumps: इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स ए यांच्यातील एकमेव अनधिकृत कसोटी सामना हा रंगतदार स्थितीत पोहचला आहे. दुसरा दिवस हा बरोबरीचा राहिला.

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया 192 रन्सने आघाडीवर, कांगारुंचं  दुसऱ्या दिवशी कमबॅक
ind vs aus
| Updated on: Aug 23, 2024 | 5:20 PM
Share

टीम इंडिया वूमन्स ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स ए यांच्यातील एकमेव अनधिकृत कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने या एकमेव सामन्यातील पहिला दिवस गाजवला. टीम इंडियाने पहिल्या दिवशी कांगारुंना 212वर गुंडाळल्यानंतर 2 विकेट्स गमावून 100 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाने 84 धावांच्या मोबदल्यात 8 विकेट्स गमावल्या. टीम इंडियाचा पहिला डाव अशाप्रकारे 184 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाला यासह 28 धावांची आघाडी मिळाली.

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात खेळ संपेपर्यंत 60 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 164 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया 192 धावांनी आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाकडून दुसर्‍या डावात एम्मा डी ब्रो आणि मॅडी डार्क या दोघांनी अनुक्रमे 58 आणि 54 धावांची खेळी केली. मॅटलान ब्राउनने 26 धावांचं योगदान दिलं. निकोल फाल्टम हीने 16 धावांची भर घातली. तर इतर फलंदाज टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर निष्प्रभ ठरले. टीम इंडियासाठी कॅप्टन मिन्नू मणी हीने दुसऱ्या डावातही 5 विकेट्स घेतल्या. तर सायली सातघरे आणि प्रिया मिश्रा या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

टीम इंडियाचा पहिला डाव

दरम्यान टीम इंडियाने 73.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट 184 धावा केल्या. टीम इंडियासाठी श्वेता सेहरावत हीने सर्वाधिक 40 धावा केल्या. तेजल हसबनीसने 32 धावांची खेळी केली. शुभा सतीशने 22 रन्स केल्या. सायली सातघरेने 21 दावा जोडल्या. मन्नत कश्यपने 19 धावांची भर घातली. राघवी बिष्ट हीने 16 तर कॅप्टन मिन्नू मणी हीने 17 धावांचं योगदान दिलं. तर ऑस्ट्रेलियासाठी केट पीटरसन हीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाकडे 192 धावांची आघाडी

वूमन्स ऑस्ट्रेलिया ए प्लेइंग ईलेव्हन : चार्ली नॉट (कर्णधार), एम्मा डी ब्रो, जॉर्जिया वॉल, निकोल फाल्टम, टेस फ्लिंटॉफ, मॅडी डार्क (विकेटकीपर), मॅटलान ब्राउन, केट पीटरसन, लिली मिल्स, ग्रेस पार्सन्स आणि निकोला हॅनकॉक.

वूमन्स इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : मिन्नू मणी (कर्णधार), श्वेता सेहरावत, प्रिया पुनिया, शुभा सतीश, तेजल हसबनीस, बिस्त राघवी, सजीवन सजाना, उमा चेत्री (विकेटकीपर), मन्नत कश्यप, प्रिया मिश्रा आणि सायली सातघरे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.