IND vs AFG, Video : शार्दुल ठाकुर याच्यानंतर कुलदीप यादव याचा भन्नाट झेल, कॅच सुटलाच होता पण…
World Cup 2023, IND vs AFG : भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात मधल्या फळीत गोलंदाजांची दमछाक झाल्यानंतर डेथ ओव्हरमध्ये जबरदस्त कमबॅक केलं. तसेच अफगाणिस्तानला 272 धावांवर रोखलं.

मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना सुरु आहे. अफगाणिस्तानने 50 षटकात 8 गडी गमवून 272 धावा केल्या आणि विजयासाठी 273 धावांचं आव्हान दिलं आहे. अफगाणिस्तानचे सुरुवातीचे फलंदाजी झटपट बाद झाल्यानंतर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी आणि अझमतुल्लाह ओमरझाई यांनी डाव सावरला. त्यामुळे भारतीय गोलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. मात्र शेवटच्या दहा षटकात भारतीय गोलंदाजांनी कमबॅक केलं आहे. अफगाणिस्तानचे चार गडी झटपट बाद केले. त्यामुळे मोठी धावसंख्या करण्यापासून अफगाणिस्तानला रोखलं. कर्णधार रोहित शर्मा याने 49 वं षटक जसप्रीत बुमराह याच्याकडे सोपवलं. समोर राशीद अली असल्याने विकेट घेणं महत्त्वाचं होतं. अखेर राशीदने उत्तुंग फटका मारला आणि कुलदीप यादवने भन्नाट झेल घेतला.
राशीद खान याला शेवटच्या षटकांमध्ये मोठी धावसंख्या करण्याची संधी होती. हातात विकेट असल्याने त्याने आक्रमकता दाखवली. एक चौकार आणि षटकारही मारला. त्यानंतर बुमराहच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारला. तेव्हा चेंडू खूपच वर गेला होता. हा झेल घेण्यासाठी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी धाव घेतली. कुलदीप यादव चेंडूखाली आला होता आणि झेल पकडण्यासाठी सरसावला. पण रवींद्र जडेजाही असल्याने संभ्रम निर्माण झाला.
Brilliant catch by kuldeep yadav 💪💪💪🤗🤗🤗#INDvAFG #ICCWorldCup#WorldCup2023 #jaspritbumrah #ViratKohli #HardikPandya#CricketWorldCup2023 pic.twitter.com/fciOhr9TDu
— R&C___explore (@MohanMu0134572) October 11, 2023
कुलदीप यादव याने झेल घेण्यासाठी हात पुढे आणि चेंडू हातून उडला. काही क्षणात हा झेल सुटला असंच वाटलं. पण लगेचच उडी घेत त्याने झेल पकडला. त्याच्या झेल पाहून रवींद्र जडेजा यानेही त्याचं कौतुक केलं. राशिद खान 12 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. यात एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. भारताकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर हार्दिक पांड्याने 2, कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकुर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
दोन्ही संघांची प्लेईंग ईलेव्हन
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.
