AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG, Video : दिल्लीचं अरुण जेटली मैदान पाच मिनिटांसाठी अंधारात, प्रेक्षकांनी लावल्या फोन लाईट्स आणि गायलं वंदे मातरम्

IND vs AFG : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील नववा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झाला. भारताने हा सामना आपल्या बाजूने सहज वळवला. अफगाणिस्तानने दिलेलं 272 धावांचं आव्हान सहज गाठलं.

IND vs AFG, Video : दिल्लीचं अरुण जेटली मैदान पाच मिनिटांसाठी अंधारात, प्रेक्षकांनी लावल्या फोन लाईट्स आणि गायलं वंदे मातरम्
IND vs AFG : अरुण जेटली मैदानात पाच मिनिटांसाठी अंधार, प्रेक्षकांनी वंदे मातरम् गात फोन लाईट्ससह दिली साथ
| Updated on: Oct 11, 2023 | 9:22 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील नववा सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात पार पडला. भारत विरुद्ध अफगाणिस्तान हे दोन संघ आमनेसामने होते. अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र निर्णय चुकीचा ठरला. अफगाणिस्तानला 50 षटकात 8 गडी गमवून 272 धावा करता आल्या. भारतासमोर विजयासाठी 273 धावांचं आव्हान होतं. हे आव्हान भारताने सहज गाठलं. रोहित शर्माच्या शतकी खेळीमुळे हा विजय सोपा झाला. पण भारताच्या डावात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. 7 वाजून 40 मिनिटांनी ड्रिंक टाइम झालं आणि लाइट अचानक बंद चालू होऊ लागल्या. काही क्षणातच फ्लड लाइट शो सुरु झाला आणि प्रेक्षकांनीही त्याला उत्तम साथ दिली.

उपस्थित प्रेक्षकांनी हातातील मोबाईलची फ्लॅश लाईट सुरु करून साथ दिली. हा लेझर शो जवळपास पाच मिनिटं सुरु होता. त्या वेळेत संपूर्ण स्टेडियम अंधारात होतं. या दरम्यान प्रेक्षकांनी वंदे मातरम् गाण्यास सुरुवात केली. यानंतर लाईट सुरु झाल्या आणि खेळ पुन्हा सुरु झाल्या.

रोहित शर्मा याने या सामन्यात 84 चेंडूत 131 धावा केल्या. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 5 षटकार ठोकले. यासह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम रोहित शर्मा याने आपल्या नावावर केला. त्याने स्पर्धेत एकूण 7 शतकं ठोकली. इशान किशनने 47 चेंडूत 47 धावा केल्या. तर विराट कोहली याने 56 चेंडूत नाबाद 55 धावा, तर श्रेयस अय्यर याने 23 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेईंग ईलेव्हन

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.

'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.