AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS 1st ODI | कॅप्टन हार्दिक पंड्या याच्याकडून विराट कोहलीकडे दुर्लक्ष

विराट कोहली याला कर्णधारपदाचा तगडा अनुभव आहे. तर या पहिल्या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा नाही. यामुळे कॅप्टन असलेल्या हार्दिक पंड्या याला विराट सल्ला देताना दिसून आला. मात्र हार्दिकने विराटच्या या सल्ल्याकडे उघड उघड दुर्लक्ष केलं.

IND vs AUS 1st ODI | कॅप्टन हार्दिक पंड्या याच्याकडून विराट कोहलीकडे दुर्लक्ष
| Updated on: Mar 17, 2023 | 8:19 PM
Share

मुंबई | टीम इंडियाचा नियमित कॅप्टन हा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात गैरहजर आहे. त्यामुळे या पहिल्या वनडे सामन्यात हार्दिक पंड्या याच्याकडे टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. उभय संघातील पहिला एकदिवसीय सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 189 धावांचे आव्हान दिले आहे. मात्र या सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या आणि विराट कोहली या दोघांमध्ये काही वाद झाल्याचं म्हटलं जात आहे. तसेच विराट कोहलीने दिलेल्या सल्ल्याकडे हार्दिकने दुर्लक्ष केल्याचीही चर्चा आहे. सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झालाय.

नक्की काय झालं?

ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगदरम्यान हा सर्व प्रकार घडला. ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 3 आऊट 129 होता. कुलदीप यादव बॉलिंग करत होता. तेव्हा विराट कोहली आणि हार्दिक कुलदीपच्या जवळ येऊन उभे राहिले. या व्हायरल व्हीडिओत विराट हार्दिकला हातवारे करत काहीतरी सल्ला देताना दिसून येतोय. मात्र सल्ला ऐकायचा दूर हार्दिकने विराटकडे पाहिलंही नाही. हा सर्व प्रकाराचा व्हीडिओ तुफान व्हायरल झाला आहे. तसेच या व्हीडिओमुळे हार्दिक आणि विराट या दोघांमध्ये वाकडं असल्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे.

हार्दिककडून विराटकडे दुर्लक्ष

दरम्यान ऑस्ट्रेलियाला 188 धावांवर ऑलआऊट केल्याने टीम इंडियाला विजयासाठी 189 धावांचं आव्हान मिळालं आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श याने सर्वाधिक 81 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या जोडीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच पहिला झटका दिला. ट्रॅव्हिस हेड याला मोहम्मद सिराज याने बोल्ड केलं. त्यानंतर मिचेल मार्श आणि कॅप्टन स्टीव्हन स्मिथ या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. ही जोडी टीम इंडियासाठी डोकुदुखी ठरत होती. तेवढ्यात कॅप्टन हार्दिक पंड्याने याने स्टीव्हनचा काटा काढला. सेट झालेला स्टीव्हन 22 रन्स करुन माघारी परतला.

यानंतर मार्नस लाबुशेन मैदानात आला. तिसऱ्या विकेटसाठी मिचेल मार्श याने लाबुशेनसह 52 धावांची भागीदारी केली. मिचेल मार्श शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र मिचेल याला रविंद्र जडेजाने आपल्या बॉलिंगवर मोहम्मद सिराज याच्या हाती कॅच आऊट केलं. मार्शने 65 बॉलमध्ये 10 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 81 धावांची खेळी केली. मिचेल आऊट झाल्याने ऑस्ट्रेलियाची 3 बाद 129 अशी स्थिती झाली होती.

मार्शनंतर जोश इंग्लिस मैदानात आला. जोश आणि मार्नल लाबुशेन हे डाव सावरण्याचा प्रयत्न करत होते. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 10 धावा जोडल्या. मात्र यानंतर रविंद्र जडेजा याने कुलदीप यादव याच्या बॉलिंगवर शानदार कॅच घेत मार्नस लाबुशेन याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. लाबुशेन याने 15 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची 4 बाद 139 अशी स्थिती झाली. एकावेळी मजबूत स्थितीत असलेल्या ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बॅकफूटवर ढकललं.

त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी मुसंडी मारत कांगारुंना मैदानात टिकूच दिलं नाही. एका बाजूने शमी आणि सिराज कांगारुंना रडवत होते. तर दुसऱ्या बाजूने रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव ही फिरकी जोडीही चांगली बॉलिंग टाकत होते.

चौथ्या विकेटनंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. कांगारुंनी शेवटच्या 6 विकेट्स या 49 धावांच्या मोबदल्यात तर शेवटच्या 4 विकेट्स या 4 धावांच्या आतच गमावल्या. शमी आणि सिराज या दोघांव्यतिरिक्त रविंद्र जडेजा याने 2, कुलदीप यादव याने 1 आणि कॅप्टन हार्दिक याने 1 विकेट घेतली.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी और मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवहन स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लाबुशेन, जॉश इंग्लिस, कॅमरुन ग्रीन,ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस, सीन एबॉट, मिचेल स्टार्क आणि एडम जम्पा.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.