AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDvsAUS | टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलिया ढेर, पहिल्या डावात 263 धावांवर गेम ओव्हर

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात 263 धावांवर रोखलं आहे. टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आहेत.

INDvsAUS | टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलिया ढेर, पहिल्या डावात 263 धावांवर गेम ओव्हर
| Updated on: Feb 17, 2023 | 4:45 PM
Share

नवी दिल्ली : नागपूरनंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी राजधानी दिल्लीतही जलवा कायम ठेवला आहे. टीम इंडिया बॉलर्सने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या कसोटीतील पहिल्याच दिवशी ऑलआऊट केलं आहे. ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यासमोर शरणागती पत्कारली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 78 ओव्हरमध्ये ऑलआऊट 263 धावा केल्या.ऑस्ट्रेलियाकडून ओपनर उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक 81 धावा केल्या. तर रीटर हँड्सकॉम्ब याने अखेरपर्यंत झुंज देत नाबाद 72 रन्स केल्या. कॅप्टन पॅट कमिन्स याने 33 रन्सचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियाच्या 3 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. तर इतर फलंदाजांना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी स्वसतात आऊट केलं.

टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर फिरकी जोडी आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी पुन्हा कांगारुंना नाचवलं. या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजानं संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर डेविड वॉर्नर तंबूत परतला. त्याने 44 चेंडूत 15 धावांची खेळी केली. त्यानंतर ख्वाजाला साथ देण्यासाठी मार्नस लाबुशेन मैदानात उतरला. दोघांनी 41 धावांची भागीदारी केली.मार्नसला अश्विननं त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेला स्मिथ भोपळा न फोडता आऊट झाला. ट्रेविड हेड 12 धावा करून तंबूत परतला.

त्यानंतर उस्मान ख्वाजा 81 धावांवर असताना रविंद्र जडेजाने त्याला तंबूत धाडलं. केएलने ख्वाजाचा कडक कॅच घेतला.  अलेक्स कॅरी मैदानात आला तसाच परत गेला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. मात्र हँडस्कॉम्ब आणि पॅट कमिन्स जोडीनं चांगली कामगिरी केली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. पण रविंद्र जडेजाने कमिन्सला पायचीत करत ही भागीदारी फोडली. टोड मर्फीही आला तसाच परत गेला. नाथन लायन (10) आणि मॅथ्यु कुहनेमन याने (6) धावा करत बाद झाले.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11 – पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.