नशिब असावं तर केएल राहुल सारखं! एकाच षटकात दोन वेळा वाचला, पाहा व्हिडीओ नेमकं काय झालं ते

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. डे नाईट कसोटीच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड मिळवली आहे. जर दुसऱ्या दिवशी भारताने कमबॅक केलं नाही तर सामना हळूहळू हातातून निसटेल. कारण पिंक बॉलने फलंदाजी करणं वाटतं तितकं सोपं नाही.

नशिब असावं तर केएल राहुल सारखं! एकाच षटकात दोन वेळा वाचला, पाहा व्हिडीओ नेमकं काय झालं ते
Follow us
| Updated on: Dec 06, 2024 | 7:47 PM

केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल सलामीला आले होते. पण पहिल्याच चेंडूवर यशस्वीची विकेट गेल्याने दडपण वाढलं. त्यामुळे केएल राहुलही सावध खेळी करू लागला. केएल राहुलने 18 चेंडूचा सामना केला पण एकही धाव घेता आली नाही. तर तिसऱ्या स्थानावर उतरलेल्या शुबमन गिलने 24 चेंडूत 18 धावा केल्या होत्या. त्यामुळे केएल राहुलवर किती दडपण होतं याचा अंदाज येतो. 19 व्या चेंडूचा सामना करताना केएल राहुल विकेट देऊन बसला. बोलँडच्या पहिल्याच चेडूवर शॉट खेळतान चुकला आणि विकेटकीपरने कोणतीही चूक न करता झेल पकडला. त्यामुळे निराश होत केएल राहुल तंबूकडे परतत होता. पण पंचांनी नो बॉलचा इशारा केला आणि जीव भांड्यात पडला. केएल राहुलला खेळण्याची एक संधी मिळाली. या संधीचं सोन करावं हीच क्रीडाप्रेमींची इच्छा होती. नो बॉल असल्याने पहिला चेंडू परत टाकावा लागला आणि निर्धाव गेला.

दुसऱ्या चेंडूवर केएल राहुलला दोन धावा करण्यात यश आलं. त्यामुळे शून्यावर बाद होण्याची भीती संपली. तिसरा आणि चौथा चेंडू निर्धाव गेला. पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा केएल राहुलचं नशिब चमकलं. कारण बॅटचा किनारा लागत चेंडू उस्मान ख्वाजाजवळ गेला. पण झेल त्याच्या हातून सुटला आणि केएल राहुलला दुसऱ्यांदा जीवदान मिळालं. अशा पद्धतीने केएल राहुलला एकाच षटकात दोन जीवदान मिळाले. या संधीचा त्याने काही अंशी फायदा उचलला. केएल राहुलने 4 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतला.

केएल राहुल आणि शुबमन गिल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी झाली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. दरम्यान, पहिल्या दिवशी भारताचा खेळ 180 धावांवर आटोपला. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर 1 गडी गमवून 86 धावा केल्या. भारताकडे अजूनही 94 धावांची आघाडी आहे. तसेच दुसऱ्या दिवशी 9 गडी झटपट बाद करण्याचं आव्हान आहे.

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.