AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma | कॅप्टन रोहित शर्मा मालिका पराभवानंतर रागाने लालबूंद, ‘या’ दोघांवर फोडलं खापर

टीम इंडियाला पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाकडून मालिका पराभव स्वीकारावा लागला आहे. ऑस्ट्रलियाने टीम इंडियावर तिसऱ्या सामन्यात 21 धावांनी विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने ही मालिका 2-1 फरकाने जिंकली आहे.

Rohit Sharma | कॅप्टन रोहित शर्मा मालिका पराभवानंतर रागाने लालबूंद, 'या' दोघांवर फोडलं खापर
| Updated on: Mar 22, 2023 | 11:59 PM
Share

चेन्नई | टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून तिसऱ्या आणि शेवटच्या निर्णायक सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवासह टीम इंडियाने भारतात 2019 नंतर पहिल्यांदा मालिका गमावली आहे. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 2-1 फरकाने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 270 धावांचे आव्हान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला ठराविक अंतराने धक्के दिले. तसेच निर्णायक क्षणी विकेट्स घेतल्या. यामुळे टीम इंडिया 248 धावांवर ऑलआऊट झाली. मालिका गमावल्यानंतर कॅप्टन रोहितने प्रतिक्रिया दिली आहे.

तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला.ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. या अंतिम सामन्यात भारताचा 21 धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने 49 ओव्हरमध्ये ऑलआऊट 269 धावा केल्या. त्या उत्तरात टीम इंडियाचा बाजार 49.1 ओव्हरमध्ये 248 धावांवर उठला. टीम इंडियासाठी विराट कोहली याने सर्वाधिक 54 धावांची खेळी केली. हार्दिक पंड्या याने 40 रन्स केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून एडम झॅम्पा याने 45 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. एश्टन एगर याने 2 विकेट्स घेतल्या. झॅम्पाने घेतलेल्या 4 विकेट्ससाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

रोहित काय म्हणाला?

कर्णधार रोहितने पराभवासाठी फलंदाजांना कारणीभूत ठरवलं. मला नाही वाटत की विजयी लक्ष्य फार मोठं होतं. खेळपट्टी दुसऱ्या डावात खेळण्यासाठी आव्हानात्मक होती. पण मला नाही वाटत की आम्ही चांगली बॅटिंग केली. भागीदारी निर्णायक ठरतात आम्ही ते करण्यात अपयशी ठरलो. आम्ही ज्या पद्धतीने आऊट झालो, ते फार निराशाजनक होतं. आम्ही अशाच प्रकराच्या खेळपट्टीवर खेळून खेळून मोठे झालोत. कधी कधी स्वत:ला संधी द्यायला हवी”, असं रोहित म्हणाला.

कोणाला धरलं धारेवर?

रोहितने ऑस्ट्रेलियाच्या 2 खेळाडूंना टीम इंडियाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरवलं. “एका फलंदाजाने अखेरपर्यंत टिकून राहणं आवश्यक होतं. पण आम्ही सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र तसं झालं नाही. आम्ही जानेवारीपासून 9 एकदिवसीय सामने खेळले आहे. आम्ही त्यातून बऱ्याच सकारात्मक गोष्टी शिकलो आहोत. हा संपूर्ण संघाचा पराभव आहे. एडम झॅम्पा आणि एश्नटन एगर या दोघांनी शानदार कामगिरी केली”, असं रोहित म्हणाला.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन आगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क आणि अॅडम झॅम्पा.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...