AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Test : जाडेजा-अश्विनमुळे खतरनाक गोलंदाज बनला, आता भारतावरच पडला भारी

IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजाने तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध शानदार प्रदर्शन केलं. त्याने आपल्या गोलंदाजीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिलीय.

IND vs AUS Test : जाडेजा-अश्विनमुळे खतरनाक गोलंदाज बनला, आता भारतावरच पडला भारी
| Updated on: Mar 02, 2023 | 2:54 PM
Share

IND vs AUS 3rd Test Match : भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज मॅथ्यू कुहनेमनने जबरदस्त प्रदर्शन केलय. ऑस्ट्रेलियाकडून तो यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 9 ओव्हर्सच्या गोलंदाजीमध्ये 5 विकेट काढल्या. मॅथ्यू कुहनेमनने या शानदार प्रदर्शनानंतर रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा यांचं तोंडभरुन कौतुक केलं.

दोन आठवड्यांपूर्वी मॅथ्यू कुहनेमन शेफील्ड शील्डमध्ये मॅच खेळत होता. दिल्ली कसोटीआधी त्याचा ऑस्ट्रेलियन टीममध्ये समावेश करण्यात आला. मॅथ्यू कुहनेमन जाडेजा आणि आर. अश्विनचा प्रशंसक आहे. त्यांना गोलंदाजी करताना पाहून कुहनेमन काही गोष्टी शिकला. आपल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात कुहनेमनने 16 धावा देऊन 5 विकेट काढल्या.

सहा महिन्यांपूर्वी आलेला भारतात

मॅथ्यू कुहनेमन सहा महिन्यापूर्वी भारतात आला होता. इथल्या एका स्पिन क्लिनिकमध्ये तो खेळला. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीत आणखी सुधारणा झाली. “मी मागच्या काही वर्षांपासून रविंद्र जाडेजा आणि अश्विनला गोलंदाजी करताना पाहतोय. मी त्यांचा मोठा प्रशंसक आहे. मी आणि टॉड मर्फी सहा महिन्यांपूर्वी चेन्नईच्या एमआरएफ अकादमीत आलो होतो. त्यामुळेच मी आज चांगली कामगिरी करु शकलो” असं कुहनेमनने सांगितलं.

कुहनेमनने काय म्हटलं?

जाडेजाने या सीरीजमधून पुनरागमन केलं. नागपूर आणि दिल्ली दोन्ही कसोटीत त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. “जाडेजा ज्या पद्धतीने क्रीजचा वापर करतो, चेंडू जुना झाल्यानंतर तो लेंथवर गोलंदाजी करायला सुरुवात करतो हे मी दिल्ली कसोटीत त्याच्याकडून शिकलो. दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये मी हीच गोष्ट शिकली व या टेस्टमध्ये त्याचा उपयोग करतोय. चेंडू खाली रहातोय. त्यामुळे फुल लेंथ गोलंदाजी करत नाहीय” असं कुहनेमनने सांगितलं. जाडेजाकडून काय शिकायला मिळालं?

जाडेजाकडून काही शिकायला मिळालं का? या प्रश्नावर कुहनेमनने सांगितलं की, “मागच्या टेस्ट मॅचनंतर मी त्यांना विचारलेलं, तुम्ही काही टिप्स द्याल का? त्यावेळी त्यांनी या सीरीजच्या शेवटी असं उत्तर दिलं” टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदा पाच विकेट काढण्याबद्दल म्हणाला की, “पीचवर चेंडू खूप टर्न होत होता. आम्ही त्याचा हिशोबाने गोलंदाजी करण्याबद्दल बोललो. नाथन लियॉन म्हणाला की, प्रत्येक दिवशी तुला अशी विकेट मिळणार नाही. त्यामुळे त्याचा आनंद घें. ऑस्ट्रेलियामध्ये जशा विकेट असतात, त्यापेक्षा ही वेगळी विकेट होती” असं कुहनेमन म्हणाला.

मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.