IND vs AUS | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूकडे कर्णधारपद
India vs Australia Odi Series 2023 | ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपआधी टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.

मुंबई | टीम इंडियाने श्रीलंका विरुद्ध अंतिम सामन्यात 10 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने यासह आठव्यांदा आशिया कपवर नाव कोरलं. त्यानंतर आता टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 आधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे. या सीरिजला 22 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी केएल राहुल याला कॅप्टन करण्यात आलंय. तर रवींद्र जडेजा उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. पहिल्या 2 सामन्यांसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव या चौघांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यानंतर तिसऱ्या सामन्यातून टीम इंडियाच्या या चौघांची एन्ट्री होणार आहे. रोहित शर्मा तिसऱ्या वनडेत कॅप्टन्सी करेल. तर हार्दिक उपकर्णधारपद सांभाळेल. तसेच टीम इंडियात अनेक महिन्यांनी अनुभवी अष्टपैलू आर अश्विन याचं कमबॅक झालं आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया
केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Squad for the 3rd & final ODI:
Rohit Sharma (C), Hardik Pandya, (Vice-captain), Shubman Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, KL Rahul (wicketkeeper), Ishan Kishan (wicketkeeper), Ravindra Jadeja, Shardul Thakur, Axar Patel*, Washington Sundar, Kuldeep Yadav, R…
— BCCI (@BCCI) September 18, 2023
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या, (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल*, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी आणि मोहम्मद सिराज.
वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.
वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना, शुक्रवार 22 सप्टेंबर.
दुसरा सामना, रविवार, 24 सप्टेंबर.
तिसरा सामना, बुधवार 27 सप्टेंबर.