IND vs AUS 5th T20I | अखेरच्या सामन्यावर पावसाचं सावट, कसं असेल हवामान?
IND vs AUS 5th T20 Bengaluru Weather Forecast | टीम इंडियाचा पाचवा सामना जिंकून मालिका 4-1 अशा फरकाने जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. टीम इंडियाने मालिका जिंकली असल्याने या अखेरच्या सामन्यात नव्या खेळाडूंना संधी मिळू शकते.
बंगळुरु | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20 सीरिजमधील पाचवा सामना हा बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाने या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. मात्र टीम इंडियाचा प्रयत्न हा अखेरचा सामना जिंकून मालिकेचा शेवट विजयाने करण्याचा असणार आहे. उभयसंघातील पाचवा सामना हा रविवारी 3 डिसेंबरला होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत या मैदानात एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न असणार आहे.
टीम इंडियाने एम चिन्नास्वामी स्टेडिममध्ये 6 सामने खेळले आहेत. टीम इंडियाने 6 पैकी 2 सामने जिंकले आहेत. 3 सामन्यात पराभव झाला आहे. तर 1 सामन्याचा निकाल लागला आहे. तर ऑस्ट्रेलियाने 2 पैकी 2 सामने जिंकले आहेत. या स्टेडियममध्ये टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला आहे. या स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्ध 4 वर्षांपूर्वी 2019 मध्ये सर्वाधिक धावसंख्या केली होती. ऑस्ट्रेलियाने तेव्हा 3 विकेट्स गमावून 194 धावा केल्या होत्या.
हवामान कसं असेल?
एक्युवेदर या वेबसाईटनुसार, सामन्याच्या दिवशी अर्थात 3 डिसेंबर रोजी बंगळुरुत साधारण पाऊस होण्याचा अंदाज आहे. पाऊस होण्याची शक्यता ही 55 टक्के इतकी आहे. तसेच कमाल तापमान 25 आणि किमान तापमान हे 20 डिग्री सेल्सियस असण्याची शक्यता.
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, अॅरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा, नॅथन एलिस आणि केन रिचर्डसन.