Suryakumar Yadav | सूर्यकुमार यादव वारंवार संधी मिळूनही फ्लॉप, वर्ल्ड कपसाठी टीम इंडियातून डच्चू?
Icc World Cup 2023 Suryakumar Yadav | सूर्यकुमार यादव याने टीम इंडियासाठी गेल्या 2-3 वर्षात टी 20 क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केलीय. सूर्याने अनेकदा एकट्याच्या जीवावर जिंकवलंय. मात्र वनडेत तो फ्लॉप ठरलाय.

मुंबई | सूर्यकुमार यादव, टीम इंडियाचा मिस्टर 360 आणि टी 20 स्पेशालिस्ट बॅट्समन. सूर्याने आयपीएलमधील विस्फोटक खेळीच्या जोरावर टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. सूर्यकुमार यादव याने कमी काळात टी 20 क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करत सर्वाचं लक्ष आपल्याकडे खेचलं. सूर्याने याच तुफानी बॅटिंगच्या जोरावर टी 20 टीममधील स्थान निश्चिच केलं. सूर्याला त्याच्या बॅटिंगमुळे वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्येही संधी देण्यात आली. सूर्याकुमार वनडे क्रिकेटमध्ये टी 20 प्रमाणे कामगिरी करेल, या अपेक्षेने टीममध्ये संधी दिली. मात्र सूर्याला वनडेत आपला जलवा दाखवता आला नाही.
सूर्यकुमारला वनडे टीममध्ये मिडल ऑर्डरमध्ये संधी देण्यात आली. मात्र सूर्याला फार काही विशेष काही करता आलं नाही. सूर्या मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यात भोपळाही फोडू शकला नव्हता. त्यानंतर निवड समितीने सूर्याच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करुन संधी दिली. पण सूर्या निवड समितीच्या आशांवर खरा ठरला नाही.
टीम इंडिया वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. सूर्याला याआधीच्या वनडेत विशेष काही करता आलेलं नाही. त्यानंतरही सूर्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध संधी देण्यात आली. त्यामुळे सूर्यासाठी वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलिया विरुद्धची एकदिवसीय मालिका ही अग्निपरीक्षा असणार आहे. सूर्याने या मालिकेत चांगली कामगिरी न केल्यास त्याला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
वर्ल्ड कपमधून पत्ता कट?
आता वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होतेय. पहिला सामना याच ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे सूर्यासाठी वर्ल्ड कपआधीची ऑस्ट्रेलिया विरुद्धची अटीतटीची असणार आहे. या मालिकेचं आयोजन हे 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलंय. तर 28 ऑक्टोबरपर्यंत वर्ल्ड कप टीममध्ये बदल करता येणार आहे. त्यामुळे सूर्याची कामगिरीच त्याला आता तारु शकते.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.