INDvsAUS | विराट कोहली चौथ्या कसोटीत करणार महारेकॉर्ड, जे सचिन तेंडुलकर यालाही जमलं नाही!

विराट कोहली याला आतापर्यंत बॉर्डर गावसकर ट्ऱॉफीत आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र त्याला चौथी कसोटीत रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

INDvsAUS | विराट कोहली चौथ्या कसोटीत करणार महारेकॉर्ड, जे सचिन तेंडुलकर यालाही जमलं नाही!
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 11:48 PM

मुंबई | बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथा कसोटी सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना 9 मार्चपासून सुरु होणार आहे. टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने अत्यंत महत्वाचा आहे. ही चौथी कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू नेट्समध्ये कसून सराव करत आहेत. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार बॅटर विराट कोहली याला मोठा रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

विराट कोहली याला अनोखं त्रिशतक पूर्ण करण्याची नामी संधी आहे. विराटने आतापर्यंत टी 20, वनडे आणि कसोटी अशा एकूण तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून 299 झेल घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीत विराट एक कॅचसह त्रिशतक पूर्ण करेल. तसेच टीम इंडियाकडून 300 कॅचचा टप्पा पूर्ण करणारा राहुल द्रविड याच्यानंतरचा दुसराच भारतीय ठरेल.

आतापर्यंत ही कामगिरी 200 टेस्ट खेळलेल्या सचिन तेंडुलकर यालाही जमलेली नाही. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 256 कॅच घेण्याचा विक्रम आहे. तर टीम इंडियाकडून सर्वाधिक कॅचेसचा विक्रम राहुल द्रविड याच्या नावावर आहे. द्रविडने निवृत्तीपर्यंत एकूण 334 कॅच घेण्याचा कारनामा केला होता.

हे सुद्धा वाचा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक कॅच घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा श्रीलंकेच्या महेला जयवर्धने याच्या नावावर आहे. जयवर्धने याने एकूण 440 कॅच घेतल्या आहेत.

सर्वाधिक कॅच घेण्याचा रेकॉर्ड

महेला जयवर्धन (श्रीलंका) – 440 कॅच.

रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) – 364 कॅच.

रॉस टेलर (न्यूझीलंड) – 351 कॅच.

जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – 338 कॅच.

राहुल द्रविड (टीम इंडिया) – 334 कॅच.

स्टीफन फ्लेमिंग (न्यूझीलंड) – 306 कॅच.

विराट कोहली (टीम इंडिया) – 299 कॅच.

टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनेमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क आणि मिचेल स्वीपसन.

टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव , सूर्यकुमार यादव आणि जयदेव उनाडकट.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.