IND vs BAN: एकदम कडक, Virat Kohli ने पकडलेली कॅच पाहून तुम्ही अवाक व्हाल, VIDEO

IND vs BAN: विराटने उत्तम फिल्डिंगचा नमुना दाखवला.

IND vs BAN: एकदम कडक, Virat Kohli ने पकडलेली कॅच पाहून तुम्ही अवाक व्हाल, VIDEO
IND vs BAN 1st ODI Virat kohli (15)Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 5:58 PM

ढाका: टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये वनडे सीरीजमधला पहिला सामना सुरु आहे. शेर-ए-बांग्ला स्टेडियममध्ये ही मॅच सुरु आहे. दोन्ही टीम्समध्ये एकूण तीन सामने होणार आहेत. पहिला वनडे सामना सध्या तरी, रंगतदार स्थितीमध्ये आहे. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. बांग्लादेशचा कॅप्टन लिट्टन दासने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांग्लादेशच्या गोलंदाजीसमोर टीम इंडिया 186 रन्सवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाकडून केएल राहुलने सर्वाधिक 73 धावा केल्या.

बांग्लादेशची निराशाजनक सुरुवात

टीम इंडियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांग्लादेशची सुरुवात निराशाजनक झाली. दीपक चाहरने पहिल्याच बॉलवर सलामीवीर नजमल होसेनला शुन्यावर आऊट केलं. त्यानंतर काही वेळाने अनामुल 14 धावांवर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला.

सुंदरने फोडली जोडी

त्यानंतर कॅप्टन लिट्टन दास आणि शाकीब हसनची जोडी जमली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी झाली. ही जोडी फोडणं आवश्यक होतं. त्यावेळी वॉशिंग्टन सुंदरने दासला 41 धावांवर केएल राहुलकरवी यष्टीपाठी झेलबाद करुन ही जोडी फोडली. त्यानंतर विकेटवर स्थिरावलेल्या शाकीबला सुंदरने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

विराटचा सर्वोत्तम झेल

सुंदरच्या चेंडूवर शाकीबने लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह मारला. त्यावेळी शॉट कव्हरला उभ्या असलेल्या कोहलीने हवेत झेप घेऊन शाकीबचा अप्रतिम झेल पकडला. विराटने फिल्डिंगचा उत्तम नमुना दाखवला. त्यावेळी मैदानातील प्रेक्षकांनाही क्षणभरासाठी विश्वास बसला नाही. शाकीब अल हसन 38 चेंडूत 29 धावा करुन आऊट झाला. त्याने तीन चौकार मारले.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.