IND vs BAN: दुसऱ्या कसोटी सामन्याबाबत मोठी अपडेट, नक्की काय झालं?
India vs Bangladesh 2nd Test : टीम इंडिया या 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. आता दुसऱ्या सामन्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

टीम इंडिया-बांगलादेश दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याचं आयोजन हे कानपूरमधील ग्रीन पार्क येथे करण्यात आलं आहे. या सामन्याबाबत जी भीती व्यक्त केली जात होती, तसंच झालंय. सामन्याला नियोजित वेळेनुसार सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणं अपेक्षित होतं. तर 9 वाजता टॉस होणार होता. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे आता बीसीसीआयने सोशल मीडियावरुन सामन्याबाबत मोठी अपडेट दिली आहे. बीसीसीआयने नक्की काय सांगितलंय? जाणून घेऊयात.
नवीन अपडेट काय?
कानपूर ग्रीन पार्क येथे सामन्याआधी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर काही वेळाने पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे आता बीसीसआयने टॉस आणि सामना सुरु होण्याची अद्ययावत वेळ सोशल मीडियावरुन सांगितली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, 10 वाजता टॉस होणार आहे. तर 10 वाजून 30 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होणार आहे. पावसामुळे एकूण 1 तासाचा खेळ वाया गेला आहे. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या खेळही विलंबानेच संपणार असल्याचं निश्चित झालं आहे.
टॉस आणि सामन्याची सुधारित वेळ
UPDATE:
Toss to take place at 10 AM IST Start of play: 10:30 AM IST
Live – https://t.co/JBVX2gyyPf#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank https://t.co/vfDnmRBrSd
— BCCI (@BCCI) September 27, 2024
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद नाहिद राणा, महमुदुल हसन जॉय, जाकेर अली, खालेद अहमद, तैजुल इस्लाम आणि नईम हसन.
