AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : विराटचं शतक रोखण्यासाठी वाइड बॉल टाकला? बांगलादेश कर्णधाराने खरं काय ते सांगून टाकलं

World Cup 2023, IND vs BAN : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेश विरुद्धचा सामना भारताने 7 गडी राखून जिंकला. विराट कोहली याने षटकार ठोकत विजयासह शतक साजरं केलं. पण या शतकापूर्वी बराच ड्रामा पाहायला मिळाला. त्याबाबत आता बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतो याने सांगितलं आहे.

IND vs BAN : विराटचं शतक रोखण्यासाठी वाइड बॉल टाकला? बांगलादेश कर्णधाराने खरं काय ते सांगून टाकलं
IND vs BAN : विराटचं शतक होऊ नये यासाठीच प्लान आखला होता का? वाइड बॉलमागचं सत्य कर्णधाराने सांगितलं
| Updated on: Oct 20, 2023 | 5:45 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने बांगलादेशवर 7 गडी राखून विजय मिळवला. स्पर्धेतील हा भारताचा सलग चौथा विजय आहे. पण या विजयापेक्षा विराट कोहलीचं शतक आणि वाइड बॉल यावरून चर्चा रंगली. विराट कोहलीला शतकासाठी 3 धावा आणि संघाला विजयासाठी 2 धावांची गरज असताना बांगलादेशी फिरकीपटू नासुम अहमद याने वाइड चेंडू टाकला. नासुम याने जाणीवपूर्वक वाइड चेंडू टाकला असं बोललं जात आहे. पण पंचांनी हा चेंडू वाइड दिला नाही. दुसरीकडे, नासुमने हा चेंडू विराटचं शतक हुकावं यासाठी वाइड टाकला होता अशी चर्चा रंगली आहे. यावर बांगलादेशचा कार्यवाहक कर्णधार नजमुल हुसैन शांतो याने स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाला नजमुल हुसैन शांतो?

आमचा असा कोणताच हेतू नव्हता. कोणताही गोलंदाज जाणीवपूर्वक वाइड चेंडू टाकत नाही, असं स्पष्टीकरण नजमुल हुसैन शांतो यांनी दिलं आहे. “नाही..नाही..नाही..हे काय ठरवून केलं नव्हतं.. आम्ही योग्य पद्धतीनेच खेळत होतो. त्यामुळे यामागे काहीच हेतू नव्हतो.”, असं कार्यवाहक कर्णधार नजमुल हुसैन शांतो म्हणाला.

वाइड बॉल नियम काय सांगतो?

एमसीसी नियम 22.4 नुसार वाइड बॉलबाबत सांगितलं गेलं आहे. यात मार्च 2022 मध्ये बदल करण्यात आला  आहे. जर फलंदाज गोलंदाजी दरम्यान मूव करत असेल तर वाइड बॉल दिला जाणार नाही. वाइड चेंडूसाठी फलंदाजाची पोजिशन बघितली जाते. विराट तो शॉट खेळताना मूव झाला होता. त्यामुळे पंचांनी वाइड बॉल दिला नाही. त्यामुळे पंचांच्या दृष्टीने तो चेंडू वाइड नसल्याचं सिद्ध होतं. दुसरीकडे,  दुसऱ्याच चेंडूवर विराट कोहलीने षटकार ठोकला आणि बोलती बंद केली होती. कारण तो वाइ़ड जरी दिला असता तरी एक धाव हवीच असती आणि षटकार मारून शतक आरामात पूर्ण झालंच असतं, हे देखील तितकंच खरं आहे.

विराट कोहली याने षटकार मारला आणि 48 वं षटक ठोकलं

विराट कोहील याने वनडे क्रिकेटमधील 48 वं शतक ठोकलं आहे. विराट कोहलीचं तिन्ही फॉर्मेटमधलं हे 77 वं शतक आहे. क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. त्याने शतकांचं शतक ठोकलं आहे. विराट कोहली दुसऱ्या स्थानावर असून 77, रिकी पॉटिंग 71 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.