AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN Live Streaming: टीम इंडिया-बांगलादेश आमनेसामने, वर्ल्ड कपआधी दोघांची चाचणी, कोण होणार पास?

India vs Bangladesh Warm up Match T20 World Cup 2024 Live Match Score: टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात मुख्य स्पर्धेआधी सराव सामना खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे.

IND vs BAN Live Streaming: टीम इंडिया-बांगलादेश आमनेसामने, वर्ल्ड कपआधी दोघांची चाचणी, कोण होणार पास?
ind vs ban t20i world cup 2024Image Credit source: bangladesh cricket x account
| Updated on: Jun 01, 2024 | 3:59 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या हंगामानंतर आता टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मोठ्या उत्साहात 2 जूनपासून क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्पर्धेपैकी एक असलेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे. त्याआधी स्पर्धेच्या पूर्वसंध्येला अखेरचा आणि टीम इंडियाचा पहिला सराव सामना होणार आहे. वर्ल्ड कपच्या मुख्य स्पर्धेआधी सहभागी 20 संघामध्ये 15 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार, 15 वा आणि अखेरचा सामना हा टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश असा रंगणार आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सराव सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सराव सामना हा आज 1 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सराव सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सराव सामना हा न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला आहे.

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सराव सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सराव सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सराव सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सराव सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील.

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सराव सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सराव सामना मोबाईलवर डिज्नी-प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), जाकेर अली (विकेटकीपर), लिटॉन दास, सौम्य सरकार, तॉहीद हृदोय, शाकिब अल हसन, महमुदुल्ला, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तन्झिद हसन, तन्झिम हसन साकी आणि तन्वीर इस्लाम.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.