IND vs ENG 2nd ODI: भारताने टॉस जिंकला, विराट कोहली IN टीम
IND vs ENG 2nd ODI: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये आज दुसरा वनडे सामना होणार आहे. ओव्हलमध्ये पहिल्या वनडेत इंग्लिश संघाला भारताने धूळ चारली.

मुंबई: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये आज दुसरा वनडे सामना होणार आहे. ओव्हलमध्ये पहिल्या वनडेत इंग्लिश संघाला भारताने धूळ चारली. आज लॉर्ड्स (Lords) वर दुसरा सामना होणार आहे. भारतीय संघ आज मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. भारताचा कॅप्टन रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात विराट कोहलीच्या खेळण्याबद्दल सस्पेन्स होता. पण विराट कोहली आजची मॅच खेळतोय. पहिल्या मॅच प्रमाणे दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवणं भारतासाठी सोपं नसेल. कारण इंग्लंडच्या संघात पलटवार करण्याची क्षमता आहे. ज्यो रुट, (Joe Root) जॉनी बेयरस्टो, जोस बटलर हे त्यांचे दिग्गज खेळाडू दमदार प्रदर्शनासाठी आतुर असतील. भारतीय संघही चांगल्या फॉर्म मध्ये आहे.
A look at our Playing XI for the 2nd ODI.
Virat Kohli back in the XI
Live – https://t.co/N4iVtxbfM7 #ENGvIND pic.twitter.com/yeJIf2xTvz
— BCCI (@BCCI) July 14, 2022
मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न
आजचा दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. भारताने पहिल्या मॅच मध्ये इंग्लंड वर 10 विकेट राखून मोठा विजय मिळवला. इंग्लंडचा डाव अवघ्या 26 षटकात 110 धावात आटोपला. याच सर्वाधिक श्रेय जसप्रीत बुमराहच आहे. 7.2 षटकात 3 निर्धाव 19 धावा 6 विकेट असं बुमहारच्या गोलंदाजीच पृथक्करण होतं. त्याच बरोबर रोहित शर्मा सुद्धा सॉलिड खेळला. त्याने 58 चेंडूत नाबाद 76 धावा फटकावल्या. यात 7 चौकार आणि 5 षटकार होते.
भारताची प्लेइंग 11
भारत- रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल
इंग्लंडची प्लेइंग 11
इंग्लंड- जोस बटलर (कॅप्टन/विकेटकीपर), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, लियम लिव्हिग्स्टोन, मोइन अली, डेविड विले, क्रेग ओवरटन, बार्यडन कार्स, रीसे टॉप्ले.
