IND v ENG Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना, Live Match कधी, कुठे?

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना आजपासून (12 ऑगस्ट) सुरु होणार आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे.

IND v ENG Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना, Live Match कधी, कुठे?
भारत विरुद्ध इंग्लंड

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून पहिला सामना अनिर्णीत सुटला. पावसाच्या व्यत्ययामुळे भारताच्या हाता-तोंडाशी आलेला सामना भारत जिंकू शकला नाही. शेवटच्या दिवशी अवघ्या 157 धावांची गरज असताना भारताला फलंदाजी करायलाच मिळाली नसल्याने सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला. दोन्ही संघाना समान गुण देण्यात आले असल्याने दोन्ही संघ सध्या बरोबरीत आहेत. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.

दोन्ही संघामध्ये दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे काही बदल होऊ शकतात. भारतीय संघात पहिला बदल म्हणजे अष्टपैलू शार्दुल ठाकुरच्या जागी आर आश्विनला खेळवले जाऊ शकते. तर दुसरा बदल म्हणून मोहम्मद सिराजच्या जागी अनुभवी इशांत शर्माला खेळवले जाऊ शकते. शार्दुल ठाकुरच्या पायाला हॅमस्ट्रिंग इंजरी झाल्यामुळे त्याची ही दुखापत कधीपर्यंत ठिक होईल हे अद्याप माहित नसल्याने दुसऱ्या कसोटीत त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी अष्टपैलू पर्याय म्हणून आर आश्विनला संधी देण्यात येईल. तसेच इशांत शर्मा याचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड चांगला असल्याने त्याला अंतिम 11 मध्ये स्थान देण्यासाठी मोहम्मद सिराजला बाहेर ठेवले जाईल. तर इंग्लंड संघा आघाडीचे गोलंदाज स्टवर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्यांनाही विश्राती दिली जाऊ शकते.

सामना कुठे खेळविला जाणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारी 12 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध अशा लॉर्ड्स मैदानात खेळवला जाईल.

सामन्याला कधी सुरुवात होणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होणार असून 3 वाजता नाणेफेक करण्यात येईल.

सामना कुठे पाहणार?

भारत आणि इंग्लंड संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल.

लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील या सामन्याचं Live Streaming SONY LIVE वर असेल. तसेच सामन्याचे महत्त्वाचे अपडेट्स टीव्ही 9 मराठीच्या या लिंकवर ही तुम्ही पाहू शकता.

इंग्लंड विरुद्ध पहिल्या टेस्टसाठी संभाव्य भारतीय संघ

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा

हे ही वाचा

IND vs ENG : भारताचा हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावला, पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

IND vs ENG : सामना अनिर्णीत सुटल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुट म्हणतो, आणखी 40 ओव्हर मिळाले असते तर…

IND vs ENG : 24 तासांच्या खेळात सिराजची इंग्लंडच्या खेळाडूंशी दुसऱ्यांदा वादावादी, कोहलीच्या मध्यस्थीनंतर सिराज शांत, VIDEO

(Ind vs Eng 2nd test live how to watch india vs england 2nd test live streaming Marathi)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI