AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND v ENG Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना, Live Match कधी, कुठे?

भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना आजपासून (2 सप्टेंबर) सुरु होणार आहे. सद्यस्थितीला दोन्ही संघ मालिकेमध्ये 1-1 च्या फरकाने आघाडीवर आहे.

IND v ENG Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना, Live Match कधी, कुठे?
भारत विरुद्ध इंग्लंड
| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 10:39 AM
Share

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका अतिशय रंगतदार स्थितीत आली आहे. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत सुटला. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दिमाखदार असा 151 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. पण ही आघाडी कायम ठेवण्यात तिसऱ्या कसोटीत भारताला यश आलं नाही. तिसरी कसोटी भारताने एक डाव 76 धावांनी गमावली. ज्यामुळे मालिका आता 1-1 अशा बरोबरीत आली आहे. त्यामुळे आजपासून सुरु होणारी चौथी कसोटी (Oval Test) दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाची असेल.

या सामन्यासाठी भारतीय संघाचा विचार करता संघात काही बदल होण्याची दाट शक्यता आहे. सर्व स्तरातून सतत आर आश्विनला (R Ashwin) खेळवण्याची मागणी होत आहे. तसेच चौथी कसोटी असणारं ओवलचं मैदान फिरकीपटूंसाठी फायद्याच असून आश्विनला त्याठिकाणी खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान दिलं जाऊ शकतं. त्याला फिरकीपटू आणि फलंदाज रवींद्र जाडेजाच्या जागी खेळवण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे स्टँडबाय खेळाडू प्रसिध कृष्णा (Prasidh Krishna) यालाही संघात स्थान मिळून शकतं. दिग्गज गोलंदाज इशांतला अजून हवा तसा फॉर्म गवसला नसल्याने त्याला विश्रांती देऊन नव्या दमाच्या प्रसिधला खेळवलं जाऊ शकतं. दुसरीकडे इंग्लंड संघात जोस बटलर खाजगी कारणामुळे खेळणार नसल्याने त्याच्या जागी इंग्लंड कोणाला खेळवेल हे पाहावे लागेल.

सामना कुठे खेळविला जाणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवारी 2 सप्टेंबर रोजी लंडन येथील ओवलच्या मैदानात खेळवला जाईल.

सामन्याला कधी सुरुवात होणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होणार असून 3 वाजता नाणेफेक करण्यात येईल.

सामना कुठे पाहणार?

भारत आणि इंग्लंड संघ यांच्यातील चौथा कसोटी सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल.

लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील या सामन्याचं Live Streaming SONY LIVE वर असेल. तसेच सामन्याचे महत्त्वाचे अपडेट्स टीव्ही 9 मराठीच्या या लिंकवर ही तुम्ही पाहू शकता.

इंग्लंड विरुद्ध पहिल्या टेस्टसाठी संभाव्य भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), ऋषभ पंत, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा

हे ही वाचा :

IND vs ENG: चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात मोठा बदल, ‘या’ खेळाडूला नेमलं उपकर्णधार

ICC Test Rankings: जो रूट फलंदाजीचा नवा बादशाह, जागतिक क्रमवारीत रोहितची ऐतिहासिक भरारी, विराट मात्र पिछाडीवर

IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यात सूर्यकुमारला जागा नाही, माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण

(Ind vs Eng 4th test live how to watch india vs england 4th test live streaming Marathi)

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.