AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : बीसीसीआयकडून रोहित शर्माला बर्थडे गिफ्ट, कॅप्टन्सीबाबत मोठा निर्णय!

Bcci On Rohit Sharma Captaincy : बीसीसीआयने आयपीएल 2025 दरम्यान आगामी इंग्लंड दौऱ्याआधी मोठा निर्णय घेतला आहे. तसेच बीसीसीआयने रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत काय ठरवलं? जाणून घ्या.

Rohit Sharma : बीसीसीआयकडून रोहित शर्माला बर्थडे गिफ्ट, कॅप्टन्सीबाबत मोठा निर्णय!
Rohit Sharma Team India CaptainImage Credit source: PTI
| Updated on: Apr 30, 2025 | 6:18 PM
Share

टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात दौऱ्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिज गमवावी लागली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताने 5 सामन्यांची मालिका 3-1 अशा फरकाने गमावली. त्याआधी न्यूझीलंडने भारतात येऊन टीम इंडियाला व्हाईट वॉश दिला. रोहित शर्मा या दोन्ही मालिकेत कर्णधार आणि फलंदाज म्हणूनही अपयशी ठरला. त्यामुळे रोहितवर चौफेर टीका केली जात होती. रोहितने टी 20i प्रमाणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्त व्हावं आणि युवा खेळाडूंसाठी संधी उपलब्ध करुन द्यावी, असं म्हटलं जात होतं. तसेच रोहित शर्मा याच्या या निराशाजनक कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रोहितच्या कसोटी कारकीर्दीचा शेवट होईल, असं म्हटलं जात होतं. मात्र त्यानंतरह बीसीसीआयने रोहितवर विश्वास दाखवला आहे. बीसीसीआयने रोहितला त्याच्या वाढदिवशी मोठं गिफ्ट दिलं आहे.

आयपीएल 2025 नंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. याआधीच्या 2 कसोटी मालिकेतील कामगिरी पाहता रोहितऐवजी दुसर्‍या कुणाला इंग्लंड दौऱ्यात कर्णधार करण्यात येणार असल्याची चर्चा होती. इतकंच काय, तर रोहितला खेळाडू म्हणूनही डच्चू मिळणार, असं म्हटलं जात होतं. मात्र आता तसं काही होणार नाहीय. बीसीसीआय रोहितलाच कर्णधार म्हणून कायम ठेवणार असल्याचं समोर आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा भाग असणार आहे.

रोहित इंग्लंडला जाणार!

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी 35 खेळाडूंची नावं निश्चित केली आहेत. हे सर्व खेळाडू 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यातील इंडिया ए टीमचा भाग असू शकतात. आयपीएल 2025 नंतर काही दिवसांनी या दौऱ्याला सुरुवात होईल.

इंग्लंड दौऱ्याबाबत 5 अपडेट्स

रोहित शर्मा इंडिया ए टीमसह इंग्लंड दौऱ्यावर रवाना होईल, अशी शक्यता आहे. टीम इंडियासाठी इंग्लंड दौरा आव्हानात्मक असणार आहे.त्यामुळे कणखर आणि मजबूत नेतृत्व असणं गरजेचं आहे, असं बीसीसीआयचं मत आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेनंतर रोहितची कर्णधापदावरुन उचलबांगडी होण्याची शक्यता होती. मात्र बीसीसीआयने रोहितवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

दोघांना संधी!

रोहित व्यतिरिक्त करुण नायर याला अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर संधी मिळू शकते. सोबतच रजत पाटीदार याचीही निवड केली जा शकते. मिडल ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरत असल्याने या दोघांना त्या स्थानी संधी मिळू शकते. या दोघांना इंडिया ए सीरिजसाठी संधी दिली जाऊ शकते.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.