AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : इंडिया की इंग्लंड? टी 20I क्रिकेटमध्ये सरस कोण? पाहा आकडे

IND vs ENG Head To Head: इंग्लंड क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर आहे. इंग्लंड या दौऱ्याची सुरुवात टी 20i मालिकेने करणार आहे. इंग्लंडची टीम इंडिया विरुद्ध टी 20i क्रिकेटमध्ये कामगिरी कशी आहे? पाहा आकडेवारी.

IND vs ENG : इंडिया की इंग्लंड? टी 20I क्रिकेटमध्ये सरस कोण? पाहा आकडे
india vs england national anthemImage Credit source: BCCI
| Updated on: Jan 20, 2025 | 11:34 PM
Share

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. या मालिकेला 22 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा बुधवारी कोलकातामधील इडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे. क्रिकेट चाहत्यांना या संपूर्ण मालिकेत चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. मुंबईकर सूर्यकुमार यादव हा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर जॉस बटलरकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या मालिकेनिमित्ताने उभयसंघात आतापर्यंत किती टी 20I सामने झाले आहेत? दोघांपैकी कोणत्या संघाने सर्वाधिक सामने जिंकले आहेत? हे जाणून घेऊयात.

हेड टु हेड रेकॉर्ड

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 24 टी 20I सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडिया टी 20I सामन्यांमध्ये इंग्लंडवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध 24 पैकी 13 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडला 11 सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं आहे.

पहिल्या सामन्याला किती वाजता सुरुवात?

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेवल्सवर पाहायला मिळतील.

टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, बुधवार 22 जानेवारी, इडन गार्डन

दुसरा सामना, शनिवार 25 जानेवारी, चेन्नई

तिसरा सामना, मंगळवार 28 जानेवारी, राजकोट

चौथा सामना, शुक्रवार 31 जानेवारी, पुणे

पाचवा सामना, रविवार 2 फेब्रुवारी, मुंबई

टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.

इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.