AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : कॅप्टन रोहित इंग्लंडविरुद्धच्या आव्हानसाठी सज्ज, पहिला सामना आज, कोण करणार विजयी सुरुवात?

India vs England Odi Series 2025 : इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेच्या 'रन'संग्रामाला आजपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज आहेत.

IND vs ENG : कॅप्टन रोहित इंग्लंडविरुद्धच्या आव्हानसाठी सज्ज, पहिला सामना आज, कोण करणार विजयी सुरुवात?
team india rohit and shreyas iyerImage Credit source: Bcci
| Updated on: Feb 06, 2025 | 8:25 AM
Share

क्रिकेट चाहत्यांची अखेर आज प्रतिक्षा संपणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20I मालिकेनंतर उभयसंघातील एकदिवसीय मालिकेचा थरार आज गुरुवार 6 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. एकूण 3 सामन्यांची मालिका ही दोन्ही संघांसाठी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेआधी फार महत्त्वाची आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या आव्हानसाठी सज्ज झाला आहे. तर इंग्लंडनेही सामन्याच्या काही तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर करत आपणही तयार असल्याचं जाहीर केलंय. टीम इंडिया टी 20I मालिकेनंतर वनडे सीरिजमध्येही पाहुण्यांना धोबीपछाड देण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे. तर इंग्लंडचा पलटवार करण्याचा प्रयत्न असणार आहे. शात क्रिकेट चाहत्यांना या मालिकेत चांगली चुरस पाहायला मिळू शकते.

पहिला सामना हा नागपूरमधील व्हीसीए स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल. सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर मॅच पाहता येईल.

गेल्या एकदिवसीय मालिकेत काय झालेलं?

दरम्यान उभयसंघात 2022 नंतर एकदिवसीय मालिका होत आहे. याआधी टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात जुलै 2022 साली एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली होती. टीम इंडियाने विराट कोहली याच्या मालिकेत 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती.

टीम इंडियाने तेव्हा मालिकेत विजयी सलामी देत 1-0 ने आघाडी घेतली. मात्र त्यानंतर इंग्लंडने दुसरा सामना जिंकत मालिका बरोबरीत सोडवली, ज्यामुळे तिसरा सामना रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट झालं. मात्र टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यासह मालिकाही जिंकली. टीम इंडियाचा आताही अशीच कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा.

Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.