AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचं गडद सावट, चौथ्या दिवशी जर तसं झालं तर….

भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना 20 जून रोजी होणार आहे. असं असताना पहिल्याच सामन्यात पावसाचं गडद सावट आहे. कसं काय ते जाणून घ्या

IND vs ENG : पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचं गडद सावट, चौथ्या दिवशी जर तसं झालं तर....
भारत आणि इंग्लंड पहिला कसोटी सामनाImage Credit source: PTI
| Updated on: Jun 19, 2025 | 3:34 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरु होत आहे. पहिला सामना लीड्समध्ये होत आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कसून सराव केला आहे. भारताची गोलंदाजी, तर इंग्लंडची फलंदाजी मजबूत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे ही पाटा विकेट असण्याची शक्यता आहे. जेणेकरून भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी चांगलाच संघर्ष करावा लागेल. तसेच इंग्लंडचे फलंदाज होम ग्राउंडचा फायदा घेऊन मोठी धावसंख्या उभारतील. अशा सर्व शक्यता वर्तवत असताना सर्वांचं लक्ष हे पावसाकडे लागून आहेत. कारण पहिल्याच सामन्यावर पावसाचं गडद सावट आहे. त्यामुळे या सामन्यात पावसामुळे खंड पडू शकतो. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकणं दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वाचं आहे. एक्युवेदर डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार ते जून दरम्यान लीड्समध्ये पावसाची शक्यता आहे. कोणत्या दिवशी कसा अंदाज आहे ते जाणून घेऊया

पहिल्या दिवशी पावसाची 5 ते 10 टक्के शक्यता आहे. यावेळी तापमान कमाल 17 डिग्री तर किमान 31 डिग्री असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 जून रोजी पावसाची शक्यता 60 टक्के आहे. यामुळे या दिवशी खेळात खंड पडणार असंच दिसत आहे. तिसऱ्या दिवशी 5 ते 10 टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशीचा खेळ होईल. हा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण चौथ्या दिवशीही पावसाची 25-30 टक्के शक्यता आहे. त्यामुळे या दिवशीही खेळात खंड पडू शकतो.पाचव्या आणि शेवटच्या दिवशीही 25-30 टक्के पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीत जर पावसाने जोरदार हजेरी लावली तर सामना ड्रॉ होऊ शकतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत एखादा सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघाच्या विजयी टक्केवारीवर परिणाम होतो.

हेंडिग्लेत टीम इंडियाचा रेकॉर्ड काही चांगला नाही. या मैदानात टीम इंडियात एकूण 7 सामने खेळली आहे. या ठिकाणी फक्त दोन सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. एक सामना ड्रॉ झाला आहे. दुसरीकडे भारत आणि इंग्लंड यांच्यात एकूण 136 कसोटी सामने झाले आहेत. त्यात भारताने 35, तर इंग्लंडने 51 कसोटी सामने जिंकले आहेत. तर 50 सामने ड्रॉ झाले आहे. आकडेवारी पाहिली तर इंग्लंडचं पारडं जड असल्याचं दिसत आहे.

Follow Us
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड...
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?
आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? पवारांच्या आंदोलनातून इशारा!
Rohit Pawar Protest | आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? रोहित पवारांच्या आंदोलनातून सरकारला मोठा इशारा!
क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, सिरसे गावात.....
Nashik | क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, झाडे पडली, सिरसे गावात हाहाकार
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!