AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : भारताच्या जैसबॉलचं इंग्लंडला जोरदार प्रत्युत्तर, दुसऱ्या सत्रात टीम इंडिया चांगल्या स्थितीत

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसं पाहिलं तर इंग्लंडच्या भूमीवर फलंदाजी करणं कठीण होतं. पण यशस्वी जयस्वालने करून दाखवलं. पहिल्या डावात अर्धशतक पूर्ण केलं.

IND vs ENG : भारताच्या जैसबॉलचं इंग्लंडला जोरदार प्रत्युत्तर, दुसऱ्या सत्रात टीम इंडिया चांगल्या स्थितीत
यशस्वी जयस्वालImage Credit source: BCCI
| Updated on: Jun 20, 2025 | 7:26 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु असून पहिल्या दिवशीचा खेळ यशस्वी जयस्वालने गाजवला. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिला एक तास खूपच जपून खेळण्याचा होता. कारण खेळपट्टी थोडी ओलसर असल्याने गोलंदाजांना फायद्याची होती. त्यामुळे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीला आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी सावध सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. पण ब्रायडन कार्सच्या गोलंदाजीवर फटका मारताना केएल राहुल चुकला आणि रूटच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर आलेला साई सुदर्शनही काही खास करू शकला नाही. त्याला पदार्पणाच्या सामन्यात खातंही खोलता आलं नाही. पण एका बाजूने यशस्वी जयस्वाल खिंड लढवत होता. पहिल्या सत्रानंतर दुसऱ्या सत्रातही यशस्वी जयस्वाल इंग्लंडच्या गोलंदाजांवर भारी पडला. त्याला कर्णधार शुबमन गिलची जोड मिळाली.

यशस्वी जयस्वालच्या खेळी पाहून बेजबॉलवर जैसबॉल भारी पडला असंच म्हणावं लागेल. यशस्वी जयस्वालने 96 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 50 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 52.08 चा होता. यशस्वी जयस्वालचं कसोटीतील 11 अर्धशतक आहे. तो इतक्यावरच थांबला नाही त्याचा खेळ पुढेही सुरुच आहे. त्याची अशीच कायम राहिली तर लवकरच कसोटीतील पाचवं शतक ठोकेल. यशस्वी जयस्वालने तग धरला तर इंग्लंडला पहिल्या डावात तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या डावात भारताने चांगल्या धावा केल्या तर गोलंदाजांना बुस्टर मिळू शकते.

दुसरीकडे, यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी पहिल्या कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 91 धावांची भागीदारी केली. भारताची इंग्लंडमधील ही सर्वात मोठी भागीदारी आहे. जयस्वाल आणि केएल राहुलने 39 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. सुनील गावस्कर आणि के श्रीकांत यांनी 1986 मध्ये इंग्लंडविरुद्ध 64 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर इतकी मोठी भागीदारी करण्याचा मान यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल जोडीला मिळाला आहे.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.