IND vs IRE T20 : जर तो चेंडू हुकला असता तर टीम इंडियाचा पराभव निश्चित होता! कसं होतं गणित ते वाचा
IND vs IRE T20 : भारत विरुद्ध आयर्लंड ही मालिका बहुतांश खेळाडूंची स्वप्न करणारी अशीच आहे म्हणावं लागेल. या मालिकेतील कामगिरीवर खेळाडूंची निवड अपेक्षित आहे. त्यामुळे विजयासोबत कामगिरीकडे लक्ष असणार आहे. पण पहिल्याच सामन्यात गणित बिघडलं असतं, पण झालं की...

मुंबई : आयर्लंड विरुद्धचा टी20 सामना भारताने अवघ्या दोन धावांनी जिंकला. पाच षटकांचा खेळ पूर्ण झाला की डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल दिला जातो. भारताने 6.5 षटकात 2 गडी गमवून 47 धावा केल्या आणि विजय मिळवला. पण या सामन्यातील गणित पाचव्या षटकातच बदललं अन्यथा भारताचा पराभव निश्चित होता. 20 षटकात भारताने आयर्लंडवर विजय मिळवला असता यात शंका नाही. पण सुरुवातीची काही षटकं आणि भारताची धावगती यातून धाकधूक वाढली होती. चौथ्या षटकापर्यंत आयर्लंडच्या पारड्यात सामना होता. पाचव्या षटक भारतासाठी महत्त्वाचं ठरलं. जर या षटकात ऋतुराज गायकवाड याने फटकेबाजी केली नसती तर भारताचा चार धावांनी पराभव झाला आहे. समालोचक वारंवार पावसाचा अंदाज वर्तवत याबाबतच गणित सांगत होता. अखेर ऋतुराज गायकवाडने भारतीय क्रीडाप्रेमींना पडलेलं कोडं सोडवलं आणि भारताला विजयी दृष्टीक्षेपात आणलं.
कसं होतं गणित ते पाहा
आयर्लंड संघाने पहिल्या टी20 सामन्यात 20 षटकं पूर्ण खेळत 7 गडी गमवून 139 धावा केल्या आणि विजसाठी 140 धावांचं आव्हान दिलं. विजयी आव्हान गाठण्यासाठी टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड ही जोडी मैदानात आली. पावसाचा अंदाज असल्याने सामना पूर्ण होणार नाही अशी शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती. त्यामुळे पाच षटकानंतर विजयी गणित कायम ठेवण्याचं आव्हान होतं. चौथ्या षटकापर्यंत सामना आयर्लंडच्या पारड्यात होता. मात्र पाचव्या षटकात ऋतुराज गायकवाडने षटकार मारला आणि गणित विजयाजवळ आणलं.
पहिल्या षटकात यशस्वी जयस्वालने आक्रमक सुरुवात केली. दोन चौकार आणि दोन धावा करत 10 धावा केल्या. दुसऱ्या षटकात भारताच्या धावसंख्येत आणखी तीन धावांची भर पडली. बिनबाद 13 धावा होत्या. तिसऱ्या षटकात भारताने बिनबाद 16 धावा केल्या. चौथ्या षटकात बिनबाद 6 धावा आल्या आणि संघाचा 22 धावा झाल्या. यामुळे भारताचं गणित बिघडलं आणि सामना आयर्लंडच्या बाजूने झुकला. त्यामुळे पाचवं षटक निर्णायक होतं.
Ruturaj's six saved India from a humiliating defeat vs Ireland,
This is Ruturaj Gaikwad's first win for India as a vice-captain.🫡 pic.twitter.com/rgDwsgBfpD
— ` (@kurkureter) August 18, 2023
पाचव्या षटकात पहिल्या चार चेंडूत 3 धावा आल्या आणि डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघ 3 धावांनी पाठी पडला होता. मात्र पाचव्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडने षटकार ठोकला आणि विजयाचं गणित सोपं केलं. पाचव्या षटकानंतर सामना थांबवला असता तर भारताने हा सामना 4 धावांनी जिंकला असता.
सहाव्या षटकात यशस्वी जयस्वालने चौकार आणि षटकार मारला. यासह दोन धावा मिळाल्या त्यामुळे भारताचा गणित आणखी सोपं झालं. सातव्या षटकात गणित बिघडलं. पहिल्या चेंडूवर एक मिळाली खरी पण त्यानंतर सलग दोन विकेट पडल्याने धाकधूक वाढली. फक्त दोन धावांचं अंतर होतं. संजू सॅमसनने चौथ्या चेंडूवर 1 धाव घेतली आणि हे अंतर तीन धावांवर आलं. पाचवा चेंडू निर्धाव गेला आणि पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवण्यात आला. भारताचा अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | जसप्रीत बुमराह (कॅप्टन) ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.
आयर्लंड प्लेईंग इलेव्हन | पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.
