AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs IRE : टीम इंडियाच्या 6 खेळाडूंचं आयर्लंड विरुद्ध होणार खास डेब्यू, 9 क्रिकेटपटूंबाबत काय?

India vs Ireland T20i Series 2026 : टीम इंडिया 2 सामन्यांच्या टी 20i मालिकेसाठी आयर्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय संघातील 6 खेळाडू पहिल्यांदाच आयर्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणार आहेत. जाणून घ्या.

IND vs IRE : टीम इंडियाच्या 6 खेळाडूंचं आयर्लंड विरुद्ध होणार खास डेब्यू, 9 क्रिकेटपटूंबाबत काय?
Shreyas Iyer Team IndiaImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 24, 2026 | 6:25 PM
Share

टीम इंडियाने अफगाणिस्तानचा मायदेशात झालेल्या एकमेव कसोटी सामन्यानंतर वनडे सीरिजमध्ये सुपडा साफ केला. त्यानंतर आता टीम इंडियाची युवा ब्रिगेड आयर्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 26 जूनपासून 2 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. बीसीसीआय निवड समितीने या आयर्लंड दौऱ्यासाठी 15 खेळाडूंची निवड केली आहे. या 15 पैकी 6 खेळाडू असे आहेत जे पहिल्यांदाच आयर्लंड विरुद्ध टी 20i सामना खेळणार आहेत. तर उर्वरित 9 खेळाडूंना आयर्लंड विरुद्ध खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे भारताच्या 6 खेळाडूंचं आयर्लंड विरुद्ध पदार्पण होणार, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

श्रेयस अय्यर नेतृत्वासाठी सज्ज

आयर्लंड दौऱ्यातून टी20i टीम इंडियात नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. श्रेयस अय्यर या मालिकेपासून टी 20i कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. तर तिलक वर्मा याची पूर्णवेळ उपकर्णधार म्हणून पहिलीच टी 20i मालिका असणार आहे. तिलक याआधीही आयर्लंड विरुद्ध खेळला आहे. तर आयर्लंडमध्ये पहिल्यांदा येणाऱ्यांपैकी 6 खेळाडू असे आहेत ज्यांच्या आतंरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात होणार आहे.

वैभव सूर्यवंशी

आयपीएल स्टार वैभव सूर्यवंशी याची वयाच्या 15 वर्षी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. वैभवने नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात ऑरेंज कॅप पटकावली होती. वैभवला त्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे वैभवच्या कामगिरीकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

तसेच सूर्यांश शेडगे याचीही पहिल्यांदाच भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. सूर्यांशला दुखापतग्रस्त नितीश कुमार रेड्डी याच्या जागी संधी देण्यात आली आहे. प्रिन्स यादव याचं आंतरराष्ट्रीय पदार्पण झालंय. तसेच प्रिन्सची आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेत निवड करण्यात आली आहे. हर्षित राणा याची आयर्लंड विरुद्ध खेळण्याची पहिली वेळ असणार आहे. तसेच ओपनर अभिषेक शर्मा याचाही हा पहिलाच आयर्लंड दौरा असणार आहे.

आयर्लंडमध्ये 15 पैकी 9 खेळाडूंना खेळण्याचा अनुभव आहे. या 9 खेळाडूंमध्ये संजू सॅमसन, ईशान किशन, अक्षर पटेल, प्रसिध कृ्ष्णा, शिवम दुबे, तिलक वर्मा, अर्शदीप सिंह, वॉशिंग्टनस सुंदर आणि रवी बिश्नोई यांचा समावेश आहे.

आयर्लंड दौऱ्यातील टी 20I मालिकेसाठी टीम इंडिया : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, प्रिंस यादव, वैभव सूर्यवंशी आणि प्रसिद्ध कृष्णा.

Follow Us
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?